central bank atm 
उत्तर महाराष्ट्र

ते एटीएमवर पैसे काढण्यास आले पण आतमध्ये दिसले भलतेच काही 

सकाळ वृत्तसेवा

निमगुळ : दोंडाईचा येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया बॅंकेची शाखा स्टेशन भागात आहेत. स्टेशनचा परिसर असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. तरी देखील मध्यरात्रीच्या सुमारास कुऱ्हाडीच्या सहाय्याने एटीएम मशिन तोडून रक्‍कम लांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु हा प्रयत्न सुरू असतानाच आरडाओरड झाल्याने एटीएम फोडणारा रंगेहाथ ताब्यात घेण्यात आला. 

पैसे काढण्यास आलेल्या तरूणांना दिसला प्रकार 
रस्त्यावरील वरदळीच्या ठिकाणी देखील आज मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास एटीएम मशीन कुऱ्हाडीने तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सुरू केला होता. याच एटीएमवर पैसे काढण्यासाठी काही तरूण गेले असता, त्यांना मशिनची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच आरडाओरड केल्यानंतर नागरीकांची गर्दी जमली. यानंतर चोरट्याचा गोंधळ उडाला आणि तो रंगेहाथ पकडला गेला. 

मशीनच्या मागे लपला 
तरूणांनी आरडा ओरड केल्यानंतर चोरटा मशीनच्या शेजारी लपून बसला होता. बाहेर गर्दी जमा झाल्याने त्याला बाहेर निघणे शक्‍य झाले नाही. यावेळी उपस्थित नागरिकांनी घडला प्रकाराबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी अशोक जगन बागुल (रा धांदरणे, ता. शिंदखेडा जि. धुळे) याला कुऱ्हाड व लाकडी दंड्यासह ताब्यात घेतले. सेंट्रल बॅंकेचे असिस्टंट मॅनेजर प्रवीण सीताराम गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याने रात्री एकच्या सुमारास चोरट्याने लाकडी दांडा व कुऱ्हाडीच्या साहाय्याने शाखेतील एटीएम मशीनच्या रूममध्ये घुसून चोरी करण्यासाठी मशीन फोडले. त्यात मशीनचे मॉनिटर, कार्डरीडर तसेच एटीम मशीनची बॉडी फोडून पैशांची चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना मिळून आल्याची फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, सहायक पोलिस निरीक्षक दिनेश मोरे तपास करीत आहेत. दोंडाईचा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असूनही सकाळी पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरे देत माहिती देण्यास टाळाटाळ केली. वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रत निघत नसल्याचे सांगत फोटोकॉपी देण्यासही टाळाटाळ केली. 

सहा दिवसात दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न 
सेंट्रल बॅंकेचे एटीएम मशीन ग्राहकांना चोवीस तास सेवा देण्यासाठी असूनही बॅंकेतर्फे एटीएमला सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले नाही. यामुळे एटीएम फोडण्याचे धाडस करण्यात आले. यामुळे त्याठिकाणी सुरक्षा रक्षक असणे गरजेचे असून यापुढे बॅंकेने दखल घेणे गरजेचे आहे. दोंडाईचा शहरात सात दिवसात दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापारी वर्गात घबराहट निर्माण झाली आहे. सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंना बीडमध्येच एवढा पाठिंबा का मिळतो? गेवराईत मराठा समाजातल्या मुलींबद्दल आक्षेपार्ह विधान

Sanjay Raut : नाशिक दत्तक घेतले मग समस्या का सुटत नाहीत? संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

Medicine MRP Change: औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार! केंद्र सरकारचा नवा आदेश लागू, अंमलबजावणी कधी करणार?

Bala Nandgaonkar : "राज ठाकरेंनी केलेली कामे तरी टिकवा!" बाळा नांदगावकरांचा भाजपला टोला

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

SCROLL FOR NEXT