Dindaicha palika Dindaicha palika
उत्तर महाराष्ट्र

निवृत्तीच्या दिवशी सेवा उपदानाची रक्कम

निवृत्तीच्या दिवशी सेवा उपदानाची रक्कम

सकाळ डिजिटल टीम

दोंडाईचा (धुळे) : येथील पालिकेची स्थापना १९५२ मध्ये झाली. तेव्हापासून (Dindaicha palika) आजपर्यंत अनेक कर्मचारी निवृत्त झाले. मात्र, निवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना सेवा उपदानाची आणि पीएफची रक्कम देण्याचा स्तुत्य निर्णय माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल (MLA Jayakumar rawal) आणि नगराध्यक्षा नयनकुवरताई रावल यांनी घेतला आहे. (dondaicha-palika-retirement-days-cash-distribute-in-retire-staff)

पालिकेत ३१ मेस निवृत्त झालेल्या रोखपाल अब्दुल गनी शेख, सोमनाथ बोरसे, रमेश मोहिते, सलीम शेख, नंदू शर्मा, जगदीश सोनार, कलाबाई देवरे या सात कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३० हजारांची सेवा उपदान व पीएफचा निधी देऊन सत्कार करण्यात आला. आमदार रावल, नगराध्यक्षा सौ. रावल, उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, गटनेता करणसिंह देशमुख, रवी उपाध्ये, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, माजी नगरसेवक जितू गिरासे, बांधकाम सभापती निखिल राजपूत, राजेश जाधव, रवी जाधव, कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, किशनचंद दोधेजा, नगरसेवक, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ बैसाणे उपस्थित होते.

यापुढेही सेवानिवृत्‍तीच्‍याच दिवशी रक्‍कम

आमदार रावल म्हणाले, की दोंडाईचा शहराचा इतिहास ज्ञात असलेले कर्तव्यदक्ष सात अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त झाल्याने कामकाजात पोकळी निर्माण होणार आहे. नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यावा. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सेवा उपदान व इतर रकमा तातडीने मिळतील, यासाठी पालिकेने प्रयत्नशील राहावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT