yawal accident 
उत्तर महाराष्ट्र

मुलीच्या विवाहाचा आनंद क्षणात विरला...कुटूंबातील दहा जणांवर काळाचा घाला 

सकाळ वृत्तसेवा

यावल : चिंचोल (ता. मक्ताईनगर) येथील नवविवाहित मुलीचा स्वागत समारंभाचा (रिसेप्शन) कार्यक्रम चोपडा येथून आटपून घराकडे परतणाऱ्या वऱ्हाडाच्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. तालुक्‍यातील हिंगोणा येथे राखेने भरून येणाऱ्या भरधाव डंपरने क्रुझरला समोरुन जोरात धडक दिल्यामुळे दहा जण जागीच ठार, तर सात जण जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. 

गाडीचा चुराडा 
चोपडा- यावल रस्त्यावर डंपर आणि क्रुझर गाडीचा अपघात एवढा भीषण होता की क्रूजर गाडीचा अक्षरश चुराडा झाला आहे. तर डंपर चालक वाहन सोडून पसार झाला. मृतांमध्ये नऊ महिला तर एक पुरुष आहेत. सर्व जखमींना सावदा येथे खासगी रुग्णालयात आणले जात असताना बहुतेक जण रस्त्यात मृत झाले होते. मृत सहा जणांना उत्तरीय तपासणीसाठी येथे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. 

मृत झालेले व्यक्‍ती 
मृतांची नावे याप्रमाणे प्रभाबाई प्रभाकर चौधरी (वय 45), सोनाली जितेंद्र चौधरी (वय 35), मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय 55), आश्‍लेषा उमेश चौधरी (वय 28), प्रभाकर नारायण चौधरी (वय 63), रिया जितेंद्र चौधरी (वय 10), प्रियांका नितीन चौधरी (वय 25, सर्व रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर), सुमनबाई श्रीराम पाटील (वय 60), संगीता मुकेश पाटील (वय 33, दोघ रा. निंबोल ता. रावेर), सोनल सचिन महाजन (वय 37, रा. चांगदेव,ता. मुक्ताईनगर) हे ठार आहेत. तर जखमींमध्ये सर्वेश नितीन चौधरी, शंतनू मुकेश पाटील ,अन्वी नितीन चौधरी, मीना प्रफुल्ल चौधरी, सुनिता राजाराम चौधरी, आदिती मुकेश पाटील आणि शिवम प्रभाकर चौधरी (वय 16) येथे ग्रामीण रुग्णालयात चिंचोली तालुका मुक्ताईनगर येथील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. घटनेचे वृत्त कळताच माजी आमदार हरिभाऊ जावळे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, बाळू फेगडे, भाजपचे शहराध्यक्ष नीलेश गडे, भाजपचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, यांचेसह विविध पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. त्यांना आवश्‍यक असणारी मदत दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT