market diwali shoping
market diwali shoping 
उत्तर महाराष्ट्र

मतदानाचा दिवस असूनही दिवाळी बाजार बहरलेलाच! 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे मतदान प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे मात्र जवळ आलेल्या दिवाळी खरेदीसाठीची लगबग होती. सकाळपासून मतदान प्रक्रिया राबविण्यात येत असली, तरी दिवाळीचा बाजार मात्र गजबलेला होता. दुपारनंतर मार्केटमध्ये गर्दी पाहावयास मिळाली. 
एकीकडे विधानसभा निवडणुकीचे फटाके वाजविण्याची तयारी झालेली असून, त्याकरिता आज मतदान प्रक्रिया पार पडली. गुरुवारी (24 ऑक्‍टोबर) मतमोजणी होणार असून, यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून फटाक्‍यांची आतषबाजी करून दिवाळी साजरी होणार आहे. परंतु दुसरीकडे शुक्रवारपासून (25 ऑक्‍टोबर) सुरू होणाऱ्या दिवाळीची लगबगही सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीचा उत्साह पाहावयास मिळत आहे. महिलांची घरी तयारी सुरू असल्याने दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. दिवाळी उत्साह आणि नवचैतन्याचा सण असल्याने यासाठी बच्चेकंपनीसह महिलांची साड्या खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू आहे. रेडिमेड कपड्यांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. 

मतदानाचा काहीसा परिणाम 
विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. परंतु या मतदानाचा दिवाळीच्या बाजारपेठेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला पाहण्यास मिळाला नाही. दुपारी बारानंतर शहरातील प्रमुख मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी होती. दिवाळीच्या दिवसांत शहरातील मार्केट लवकर खुले होत असते. आज मात्र एक तास उशिरा दुकाने उघडण्यात आली होती. शिवाय काही नागरिकांनी सकाळी मतदानाचा हक्‍क बजावून दुपारनंतर बाजारात खरेदीसाठी येणे पसंत केले होते; तर ग्रामीण भागात मतदान असणाऱ्यांना मात्र आज खरेदीसाठी येता आले नसल्याने बाजारावर काहीसा परिणाम दिसून आला. दुपारी चारनंतर मात्र मार्केटमध्ये बऱ्यापैकी गर्दी झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT