Fruit crop insurance Fruit crop insurance
उत्तर महाराष्ट्र

धुळे जिल्‍ह्यात फळ पीक विमा योजना लागू

धुळे जिल्‍ह्यात फळ पीक विमा योजना लागू

सकाळ डिजिटल टीम

सोनगीर (धुळे) : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित मृग बहारमध्ये धुळे जिल्ह्यासाठी डाळींब, मोसंबी आणि लिंबू आदी फळांसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. डाळिंबासाठी शेतकऱ्यांचा हिस्सा सहा हजार पाचशे रुपये, लिंबूसाठी तीन हजार पाचशे रुपये आणि मोसंबीसाठी चार हजार रुपये प्रति हेक्टरी विमा हप्ता भरावा लागेल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी कळविले आहे. (Fruit-crop-insurance-scheme-implemented-in-Dhule-district)

फळ पिकांचे कमी तापमान, वेगवान वारे, अवेळी पाऊस आदी प्रतिकूल हवामान घटकांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून निघावे म्हणून राज्यात हवामानावर आधारित २०२१ - २२ साठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजना डाळिंब, मोसंबी व लिंबूसाठी लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहील.

उत्‍पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकासाठी चार हेक्टर क्षेत्र मर्यादेत विमा नोंदणीची मुभा आहे. एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारपैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण कवच लागू राहील.

योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

डाळिंबासाठी १४ जुलै, लिंबू व मोसंबीसाठी ३० जून ही मृगबहारासाठी अंतिम तारीख आहे. धुळे जिल्ह्याकरिता डाळिंब, मोसंबी व लिंबू या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाईची रक्कम शासनाने विहित केलेल्या अटींच्या अधीन असेल. धुळे जिल्ह्यातील अधिसूचित महसूल मंडळातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळ‍ पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

एका क्षणात सगळं बदललं ! मधू कांबीकरांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग, स्टेजवर नाचल्या, अन्...!

सारा तेंडुलकरच्या बर्थडे पार्टीत तिला घट्ट मिठी मारणारा तो तरुण कोण? वहिनी सानिका पाहतच राहिली; Video Viral

Latest Marathi News Live Update : मोदी सरकार ज्ञानेशकुमार यांचं संरक्षण करतंय, राहुल गांधी यांचा आरोप

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवात नाही, तर कधी वाजणार? अंबाबाई मंदिर परिसरातील ‘म्युझिकल खांब’ बंदच; लाखो रुपये खर्च

SCROLL FOR NEXT