ganesh aarti
ganesh aarti 
उत्तर महाराष्ट्र

सॅनिटायझर लावून आरती घेत असाल तर सावधान... 

सकाळवृत्तसेवा

सारंगखेडा : गणेशाची आरती झाल्यानंतर सर्वाधिक पाधान्याने आरती घेतली जात असते. परंतु हाताला सॅनिटायझर लावून आरती घेणे तुम्हाला महागात पडू शकते. सॅनिटायझरमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे तुमचा हात भाजण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 
सध्या कोरोनामुळे हात स्वच्छ करण्यासाठी साबनासह सॅनिटायझरचा मोठा वापर होत आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता वारंवार हात स्वच्छ करणे महत्वाचे ठरत आहे. त्यात सध्या सर्वत्र जल्लोषात लाडक्या गणरायाचे आगमण झाल्याने सोशल डिस्टन्स ठेवत तसेच सर्व नियम पाळत आरती वगैरे धार्मिक विधी होत आहेत. नकळत आरती घेण्याच्या आधी जर हाताला सॅनिटायझर लावले असेल तर अशातून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्वालाग्राही सॅनिटायझर लावल्यास तो पेट घेण्याची शक्यता असते. त्यामुळे भाविकांनी सॅनिटायझर ऐवजी साबणाने हात धुण्याचा सल्ला दिला जात आहे. 

आरती करताना ही घ्या काळजी 
आरती ओवळताना किंवा घेताना हात व दिवा यामध्ये अंतर ठेवणे आवश्यक आहे. 
आरतीपूर्वी सॅनिटायझरचा वापर टाळावा. 
शक्यतो साबन व पाण्याने हात स्वच्छ करावे. 
आरतीचे ताट हाताळणाऱ्याला संबंधित पूर्वसूचना द्यावी. 

सॅनिटायझर पेट का घेतो 
सॅनिटायझरमध्ये ६० ते ७५ टक्के इथनोल, अल्कोहोल, १५ टक्के ग्लिसरीन, एक ते पाच टक्के प्रोपिलीन ग्लायकोल, ट्राईइथलोमाईन, पाणी, सुवासिक रंग यांचे मिश्रण असते. इथनोल, अल्कोहोल हे ज्वलनशील असून सॅनिटायझरमध्ये तो अधिक प्रमाणात असतो. तसेच हर्बल सॅनिटायझरमध्येही अल्कोहोलचा वापर केलेला असतो. अल्कोहोल त्वचेवर असताना तो भाग आगीजवळ नेल्यास पेट घेऊ शकतो, अशी माहिती विज्ञान मंडळाचे माजी उपप्राचार्य डी. सी. पाटील यांनी दिली 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT