live
live 
उत्तर महाराष्ट्र

गोठ्यांच्या गॅस चेंबरमध्ये गुदमरून एकाचा मृत्यू,दोघे अत्यवस्थ

युनूस शेख

जुने नाशिक ः वडाळा गाव परिसरातील गोठ्याजवळील ड्रेनेज चेंबर साफ करणाऱ्यासाठी गेलेल्या खाजगी कर्मचाऱ्याचा गुदमरुन मृत्यू झाला. तर दोघे जण जख्मी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

वडाळागाव रस्त्यावर दुपारी 12 वाजेच्या सुमारास प्रकार घडला. गोट्यांतील मलमूत्र चेंबरमध्ये सोडण्यास महापालिकेने बंदी केली आहे. मात्र चेंबरमध्ये मलमूत्र सोडले जात असल्याने चेंबर तुबले होते. वडाळारोडवरील चेंबरमध्ये परिसरातील गोट्याचे मलमूत्र सोडले जाते. त्यामुळे नेहमी याठिकाणी चेंबर तुंबण्याच्या घटना घडतात. शनिवार (ता.23) अशा प्रकारे चेंबर तुंबल्याने येथील एका गोट्यातील कामगार हेमंत सोमनाथ मडके (वय.30,रा.वडाळारोड) हे दुपारी साफसफाई करण्यासाठी गेले. प्रथम त्याने गोठ्याच्या परिसरातील सफाई केली. चेंबर तुंबल्याचे त्याच्या लक्षात आले. चेंबर साफ करण्यासाठी तो चेंबरमध्ये उतरला. त्यातील गॅसमध्ये त्याचा जीव गुदमरु लागल्याने त्याने खूप वेळ आरडाओरड केला. पण कुणास त्याचा आवाज आला नाही. दरम्यान गोट्या जवळ उभा असलेला मृताचा मुलगा सोहिल यांच्या लक्षात प्रकार आला. त्याने चेंबरमध्ये उतरुन वडीलांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याचाही श्‍वास गुदमरल्याने तो अर्ध्यावर बेशुद्ध झाला. त्यास परिसरातील नागकरीकानी ओडून बाहेर काढल्याने त्याच जीव वाचला. घटनेची माहिती अग्निशमन विभागास मिळताच त्यानी अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होवून मदत कार्य सुरु केले. चेंबरचे तोंड निमुळते होते. मदत कार्यात अडचण येत होती. शिडी टाकून अग्निशमन कर्मचारी कामगारास वाचविण्यासाठी उतरत असताना तेही चेंबरमधील गॅसने गुदमरुन बेशुद्ध झाले. अन्य कर्मचाऱ्यांनी त्याना बाहेर काढले. त्यांच्या छातीवर पंप केल्याने त्याचा श्‍वास मोकला होवून जीव वाचला. त्याना उपचार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले. चेंबरचे तोंड निमुळते असल्याने ऑक्‍सीजन सिलेंडर घेवून उतरणे शक्‍य नव्हते. कर्मचाऱ्यानी शेवटी खबरदारी घेत दोरीचा गळ बनवून मृताला बाहेर काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT