उत्तर महाराष्ट्र

खडसेंनी पाडापाडी करणाऱ्यांची नावे जाहिर करावी : गिरीश महाजन 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पक्षात कोणीही उमेदवारांना अंतर्गत पाडापाडी करण्याचे उद्योग करीत नाही. ऍड.रोहिणी खडसे, पंकजा मुंडे यांना पाडल्याचा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा आरोप चुकिचा आहे. त्यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी नावेच जाहिर करावी असे अवाहन माजी मंत्री व पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केले. 
जळगाव येथे तापी महामंडळाच्या विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, कि पंकजा मुंडे व ऍड,रोहिणी खडसे यांना पक्षातर्गत कोणीही पाडलेले नाही. पक्षात असा पाडापाडीचा प्रकार केला जात नाही. मुक्ताईनगर मतदार संघात एकनाथराव खडसे गेल्यावेळी फारश्‍या मोठ्या मताधिक्‍यांने निवडून आलेले नाहीत,यावेळी त्या मतदार संघात ते उमेदवार नव्हते,त्यांच्या कन्या ऍड.रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. त्याच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील उभे राहिले.ते प्रत्येक वेळी विरोधात उभे राहिले आहेत. यावेळी त्यांना शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा मिळाला.त्यामुळे रोहिणी खडसेंना पराभव पत्करावा लागला. मात्र यावेळीही खडसे उमेदवार असते. तर निवडून आले असते, परंतु पक्षाने खडसे यांना उमेदवारी दिली नाही.मात्र पक्षातून अतंर्गत त्यांना पाडण्यात आले हा आरोप पूर्णपणे चुकिचा आहे.त्यांच्याकडे जर पुरावा असेल त्यासह पाडापाडी करणाऱ्याची नावे जाहिर करावीत. पक्षात अंतर्गत उमेदवाराच्या पाडापाडीचा उद्योग कोणीही करीत नाहीत. 

पक्षातून कोणीही फुटणार नाहीत. 
पक्षातून बारा आमदारांचा गट फुटणार असल्याच्या चर्चेबाबत बोलतांना ते म्हणाले, पक्षातून कोणीही फुटणार नाही या सर्व अफवा आहेत. पंकजा मुंडे यांनी तर बंडखोरी रक्तात नसल्याचेच जाहिर केले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराचा प्रश्‍नच नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT