live 
उत्तर महाराष्ट्र

गोंदे दुमाला येथील तिहेरी अपघातात तीन जण जागीच ठार, दोनजण गंभीर

ज्ञानेश्वर गुळवे,सकाळ वृत्तसेवा

अस्वली स्टेशन- नाशिक-मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला येथील प्रभू ढाब्याजवळ इनोव्हा, पिकअप व ट्रक यांच्यात  काल रात्री झालेल्या  अपघातात तीन जण जागीच ठार झाले.काहीजण गंभीर जखमी आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी इनोव्हा गाडी क्र.MH-15 DC 7160 चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावरून पलीकडील मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या पिकअप वर जावून आदळली,त्याच दरम्यान मागुन येणारी ट्रक क्र.MP-09 MM 7659 अनियंत्रित होऊन तो अपघातग्रस्त पिकअपवर जावून आदळला हा अपघात इतका भीषण होता की यात इनोव्हा गाडीतील तीन जणांच्या शरीराचे छिन्न विच्छिन्न तुकडे झाल्याने जागीच ठार झाले.
प्रफुल्ल धनंजय प्रभू (वय २४), रोहित शिवाजी पवार (वय २५), जावेद जमायूद्दीन सिद्धिकी( वय२७) सर्व नाशिकचे रहिवासी आहे. तीन गंभीर जखमी झाले आहेत. नरेंद्रनाथ संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तात्काळ जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहेत. तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुहास देशमुख घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्याचा  प्रयत्न केला.घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार परदेशी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी लाल रंगात! देशांतर्गत गुंतवणूकदारांचा बाजाराला आधार; Meesho चे शेअर घसरले

माहुली घाटात १५० फूट दरीत कोसळली कार; चालकाचा जागीच मृत्यू, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घटना, कारचा चक्काचूर..

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT