live 
उत्तर महाराष्ट्र

एक,दोन नव्हे पन्नास वर्षानंतर गोंदेला थाटला बाजार....ग्रामपंचायतींचा पुढाकार!

ज्ञानेश्वर गुळवे,सकाळ वृत्तसेवा

अस्वली स्टेशन- घोटी शहरानंतर वाडीवऱ्हे व टाकेद बु येथील आठवडे बाजारांच्या धर्तीवर गेल्या पन्नास वर्षांनंतर पहिल्यांदाच गोंदे दुमाला येथे दर शनिवारी बाजार भरणार आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून हा बाजार थाटत आहे.

   आज सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणपत जाधव, सरपंच शरद सोनवणे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच विजू नाठे, माजी सरपंच कचरू धोंगडे, जानोरीचे सरपंच अर्जुन भोर, सोसायटी चे अध्यक्ष विजय नाठे, ग्रामपंचायत सदस्य परशराम नाठे, गोपाळ नाठे, कृष्णा सोनवणे, सुनिल नाठे, हिरामण नाठे, हरि बोराडे, बंडू नाठे, बाबूराव नाठे, योगेश बोराडे , ग्रामविकास अधिकारी हनुमान दराडे, भाऊसाहेब कातोरे आदिंसह ग्रामस्थ, दुकानदार उपस्थित होते.
 

-इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील दहा-पंधरा गावातील लोकांचा नेहमी संपर्क असलेले गाव  विविध कंपन्यांच्या कामगारांमुळे तसेच नाशिक-मुंबई महामार्गावर सर्वाधिक वर्दळीचे गाव असल्याने येथे आठवडे बाजार असणे आवश्यक असल्याचे गावातील जेष्ठ नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतुन पुढे आली.

काय असेल बाजाराचे वैशिष्ठ

- शनिवारी बहुतेक कंपन्यांना साप्ताहिक सुट्टी असल्याने याच दिवशी  आठवडे बाजार भरणार

- ग्रामपंचायतीकडून  छोट्या दुकांदारास पन्नास रुपये तर मोठ्या दुकानदारास शंभर रुपये प्रोत्साहन भत्ता

-दुकादारांचाही प्रतिसाद लाभला पहिल्याच दिवशी तब्बल पन्नास साठ व्यापाऱ्यांनी थाटली दुकाने

-- गृहोपयोगी कटलरी, भाजीपाला, मासेवाले,भांडे, हार्डवेअर,मिठाई खाऊची दुकाानांचा समावेश

- खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी

गैरसोय दूर होण्यास मदत

" घोटी मुख्य बाजारपेठे नंतर वाडीवऱ्हे,टाकेद बु येथेच आठवडे बाजार भरला जात असे ग्रामीण भागातील प्रामुख्याने शेतकऱ्यांना भाडे खर्च करून याठिकाणी बाजारासाठी जावे लागत असे आज
गोंदे दुमाला येथे आठवडा बाजार भरला असल्याने दहा गावच्या ग्राहकांना जवळपास वस्तू मिळत असल्याने गोंदे दुमाला ग्रामपंचायतीने मांडलेल्या संकल्पनेचे ग्रामीण ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
- एच दराडे,ग्रामसेवक गोंदे दुमाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी; ५ ते ६ किमीपर्यंत रांग

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT