live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

मुलगी आली लक्ष्मीच्या पावलांनी...

सकाळ वृत्तसेवा

भडगाव : मुलीच्या जन्माचे स्वागत सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे अनोख्या पद्धतीने करण्यात आले. जन्माला आलेल्या मुलीच्या पायांनी उंबऱ्यातील धान्याचे माप ओलांडण्यात आले. तसेच तिची चिमुकली कुंकवाची पावले लक्ष्मीची पावले समजून घरामध्ये उमटविण्यात आली. 

येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांच्या कुटुंबात मुलीचे पहिल्यांदाच आगमन झाल्यानंतर हा अनोखा कार्यक्रम करण्यात आला.

मुलगी झाल्याने अनेकजण नाराज होतात. तर अनेक जण मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करत असतात. परंतू, भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी कन्यारत्न झाल्यानंतर देखील तिचे जल्लोषात स्वागत केले. कन्या सन्नीधीचे रविवारी (ता.18) चिंचोली (ता.सिन्नर) येथे आपल्या घरी असे सुंदर स्वागत केले.

मुलगी ही घराची लक्ष्मी असते म्हणून तिच्या गृहप्रवेशाचे लक्ष्मी पावलांनी स्वागत केल्याचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले. त्यांच्या या आगळ्या वेगवेगळ्या स्वागत चर्चेची विषय ठरले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT