उत्तर महाराष्ट्र

जळगावात पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : शहरातील कोल्हे हिल्स सौखेडा शिवारातील जाणता राजा शाळेजवळच पत्री शेड मध्ये वास्तव्यास असलेल्या बांधकाम मजुरांच्या पाच वर्षीय मुलीला गाढझोपेत असतांना उचलून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना दसऱ्याच्या पहाटे घडली. अवघ्या काहीच दिवसांपूर्वी याच परिसरात आदेश बाबा नामक भोंदुने अशाच पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला होता, घटनेला सहा महिने लाटत नाही तोवर आज दुसरी घटना घडली. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने पावले उचलल्याने संशयित राणासींग प्रकाशसिंग जुन्नी याला अवघ्या चार तासातच अटक करण्यात आली आहे. 


घटनास्थळावरून घेतलेल्या माहिती नुसार, सावखेडा शिवाराला लागून असलेल्या कोल्हे हिल्स्‌ परिसरात नगरसेवक संतोष पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे, या बांधकामावर कामावर असले कुटुंबीय जाणताराजा स्कूल जवळ पत्र्याचे शेड टाकून वास्तव्याला आहेत. संपूर्ण कुटुंबच सेंन्ट्रींग मजूर असल्याने संध्याकाळी काम संपल्यावर थकवा येऊन एकत्रच झोपले होते. कुटुंबीय गाढ झोपेत असताना पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चिमुरडीच्या हुंदक्‍यांसह रडण्याचा आवाज आल्याने वडील व काका दोन्ही जागी झाले, घराबाहेर येऊन बघितले तर, चिमुरडी भंयकंपीत स्वरात टाहो फोडत होती, आणखी जवळ जाऊन बघितल्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पिडीता विव्हळत असल्याने वडील व काका दोघांना घडला प्रकार समजला त्यांनी, जवळपास शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र कोणी आढळून आले नाही, तो पर्यंत दिवस उजाडल्याने पोलिसांना कळवण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखता वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला होता. पिडीतेला तत्काळ जिल्हारुग्णालयात हलवण्यात येऊन सूत्रे स्वतः: पोलिस अधीक्षकांनी हाती घेतली. पिडीतेच्या आई-वडिलांचे जाब-जबाब नोंदवून घेत तालुका पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

फॉरेन्सीक टिम दाखल 
संशयिताचे, चोरीच्या उद्देशाने पत्रीटीनचे घर असलेल्या पिडीतेच्या घराच्या दाराला आतून लागलेली कडी उघडून आत प्रवेश करीत तिला उचलून नेल्याचे कुटूंबीयांनी सांगीतले असुन घटनेची माहिती कळताच सकाळीच पोलिस अधीक्षक दत्ता कराळे, अप्पर अधीक्षक लोहीत मतांनी, डीवायएसपी सचिन सांगळे, सुनील कुराडे घटनास्थळ गाठले. सांगळेंनी शहरातील इतर पोलिस निरीक्षक व सर्व डीबी टिम पाचारण केल्यावर अनिरुद्ध अढाव,एकनाथ पाडळे, सुप्रिया देशमुख, कादीर खान तडवी यांच्यासह डीबी कर्मचाऱ्यांची एकत्रित टिम तयार करून संशयिताचा शोध घेत संशयित राणासींग प्रकाशसिंग जुन्नी (रा.राजीवगांधी नगर)याला ताब्यात घेतल्यावर पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT