सावदा ः गाते (ता. रावेर) येथील सात वर्षे वयाच्या दोन मुलींवर 51 वर्षाच्या इसमाने वारंवार लैंगिक अत्याचार केले. या घटनेची समाजात निंदा होत असून, संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलींच्या नातेवाइकांनी सावदा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने संशयिताविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चॉकलेट देण्याचा केला बहाणा
गाते येथील सात वर्ष वयाच्या दोन लहान मुली मैत्रिणींसोबत आपल्या गल्लीतील एका किराणा दुकानावर चॉकलेट घ्यायला नेहमी जात असत. त्याच गल्लीत राहणाऱ्या संशयित अरुण यशवंत मेढे (वय 51) याने या मुलींवर पाळत ठेवून त्यांना घरात बोलवत, मी तुम्हाला चॉकलेट आणि पैसे देतो अशी लालूच दाखविली. याची संधी साधून त्या मुलींवर गेल्या महिन्यात दोन वेळा लैंगिक अत्याचार केले.
शेवटी सापडलाच
अत्याचार करणाऱ्या या इसमाने दोन्ही मुलींवर गेल्या तीन चार दिवसांपूर्वी पुन्हा लैंगिक अत्याचार केले. सदर प्रकार मुलींनी पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यास 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश जाधव यांनी भेट देऊन, या घटनेची माहिती घेतली. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार तपास करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.