bibtya sugar cane 
उत्तर महाराष्ट्र

उस कापताना अचानक ते समोर अन्‌ मजुर भीतीने घामाघूम

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर : रिगाव (ता. मुक्ताईनगर) शिवारातील उसाच्या शेतात उसतोडणी करणाऱ्या मजुरांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यामुळे मजुरांसह शेतकऱ्यांमध्ये सुद्धा दहशत पसरली असून, वनविभाग तत्काळ हालचाल करत परिस्थिती नियंत्रणात आणून याबाबीकडे लक्ष ठेवून आहे. 
रिगाव-कोऱ्हाळा रस्त्यावरील रिगाव गावापासून काही अंतरावर असलेल्या गट क्रमांक आठमध्ये संतोष विटे यांच्या शेतात आज उस तोडण्याचे काम सुरु होते. निम्म्यापेक्षा कमी शेतातील उसाची तोडणी कामगारांनी केली. या दरम्यान सकाळी दहाला अचानक बिबट्याचे दोन बछडे उस तोडणी कामगारांच्या समोर आले आणि कामगारांची बोबडीच वळली. भीतीने ते घामाघूम झाले. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली आणि शेकडोच्या संख्येने गावकरी घटनास्थळी बिबट्याची पिल्ले पाहण्यासाठी हजर झाली. याबाबत वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, वनपाल ए. जी. पाटील, पी. टी. पाटील, डी. जी. पाचपांडे, वनरक्षक सुप्रिया देवरे, धोंडीबा धुळगुंडे, रहीम तडवी, राम आसुरे, विजय अहिरे यांच्यासह वनमजूर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

उस तोडणी बंद 
यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांना वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी एक- दोन दिवस उस तोडणी थांबविण्याचे आवाहन केले. या प्रकारामुळे शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतातील पिकांना रात्री पाणी कसे द्यावे हा प्रश्न शेतकऱ्यानसमोर असून, शेती शिवारातील वीजपुरवठा दिवसा सुरु ठेवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

वनविभाग लक्ष ठेवून 
सकाळपासूनच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात कॅमरे लावले आहेत. बिबट्याची मादी पिल्लांना सुरक्षित स्थळी नेईपर्यंत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले जाणार असून, बिबट्याची मादी जर आलीच नाही तर या पिल्लांच्या सुरक्षेसाठी वन विभागाकडून पर्यायी योग्य पाऊले उचलली जातील तोपर्यंत शेतकरी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, वनपाल ए. जी. पाटील यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT