उत्तर महाराष्ट्र

काळी बहुली, लिंबू-अंडे.. मध्यरात्री घरावर येतात दगड! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : शहरातील वाघनगर संस्कार कॉलनीत गेल्या आठ, दहा वर्षांपासून रहिवासी असलेल्या निवृत्त दाम्पत्याला परिसरातीलच काही खोडसाळ वृत्तीच्या टारगट तरुणांकडून त्रास दिला जात आहे. भीती घालण्यासाठी कधी दारावर जादू टोण्याच्या उद्देशाने लिंबू, अंडे, काळी बाहुली फेकली जाते तर कधी घरावरच दगडफेक होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्रास असहनीय झाल्याने रजनी सुनील हेडाऊ यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. 
जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सिंग महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापिका रजनी सुनील हेडाऊ या पती सुनील, महाविद्यालयीन मुलगी ऐश्‍वर्या असे तिघे वाघनगरातील साई संस्कार कॉलनीत वास्तव्याला आहेत. दोघेही निवृत्त आणि वयोवृद्ध असल्याने कॉलनीत कोणाशी जास्त संपर्क नाही. दिवसभर श्री. व सौ. असे दोघेही घरातील झाडे झुडपांची देखरेख आणि कुत्र्याचा सांभाळ करण्यात व्यस्त असतात. गेल्या दोन महिन्यांपासून या कुटुंबाला हेतू पुरस्सर त्रास दिला जात असून, भीती निर्माण करण्यासाठी मुद्दाम छळ चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. आजवर अमावस्या, पौर्णिमेला घरात लिंबू-मिरची, काळी बाहुली फेकल्या गेली, आता चक्क दगड मारून घराची काच फोडण्यात आल्याने हेडाऊ दांपत्य कमालीचे धास्तावले असून, रजनी यांनी पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली आहे. 

जादूटोण्याची भीती 
जादूटोण्याच्या उद्देशाने हेडाऊ यांच्या दारावर कधी टोचलेला लिंबू, काळी बाहुली दर पौर्णिमेला तर अमावस्येला दारात टाकण्यात येऊन भीती निर्माण केली जात होती. जादूटोण्याला भीत नाही म्हणून चक्क मध्यरात्रीनंतर एक, दीडच्या सुमारास घराच्या तावदानांवर दगड मारून फोडण्यात आली आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayor Manjusha Nagpure : पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर, 'या' 227 ठिकाणांसाठी नवा प्लॅन

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT