dhamm parishad jalgaon imege
dhamm parishad jalgaon imege 
उत्तर महाराष्ट्र

बौध्द तिर्थक्षेत्रांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी संघटित होण्याची गरज :ऍड. भीमराव आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सारनाथ हे बौध्दांचे तिर्थक्षेत्र असल्यामुळे परदेशी पर्यटक भारतात येतात. त्यापासून ६० टक्के महसूल सरकारला प्राप्त होतो. भारतातील बौध्दांची तिर्थस्थळे यावर अतिक्रमण सुरु आहे. ते रोखण्यासाठी बौध्दांनी संघटीत होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ऍड. भीमराव आंबेडकर यांनी केले. 

क्‍लिक कराः  सोने 72 तासांमध्ये 1700 रुपयांनी वधारले

भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा जळगाव अतंर्गत श्रामणेर शिबीर व खान्देशस्तरीय धम्म परिषद वाघनगर परिसरातील यशवंत भवनात आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर भन्ते अशोक किर्ती थेरो, भन्ते दीपंवरजी थेरो, भन्ते बी. संघपाल, भन्ते धम्मदिप, धम्मदूत डी.एस.तायडे, भारतीय बौध्द महासभेचे राज्याध्यक्ष यु.जी.बोराडे, एस.के.भंडारे, राष्ट्रीय महासचिव जगदिश गवई, माजी प्रांताधिकारी सोमा तायडे, जिल्हाध्यक्ष शेलैंद्र जाधव,जिल्हा महासचिव सुमंगल अहिरे, शहराध्यक्ष अनिल शिरसाळे, केंद्रिय शिक्षक प्रमुख के.वाय. सुरवाडे, विठ्ठल भुरे, उद्योजक संजय इंगळे, अभियंता विजय मौर्य, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता हरी सुरवाडे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी मिलींद बाविस्कर, बी.एन.वानखेडे, सेवानिवृत्त अभियंता आत्माराम शिरसाठ, प्रा. सत्यजीत साळवे, केंद्रिय शिक्षिका वैशाली सरदार, करुणा नरवाडे आदी उपस्थित होते. 
ऍड. आंबेडकर पुढे म्हणाले की, सध्यस्थितीमध्ये घटनेची योग्यप्रकारे अंमलबजावणी न करता त्याची पायमल्ली करण्याचे काम या देशात सुरु आहे. ती रोखण्याची जबाबदारी बौध्दांची शिखर संस्था, मातृसंस्था भारतीय बौध्द महासभा ही नवतरुणांना बौध्द धम्माच्या प्रवाहात आणून प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. तसेच महिलांनाही प्रशिक्षित करण्याचा भारतीय बौध्द महासभेचा संकल्प आहे, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन सुमंगल अहिरे यांनी केले.

जळगावात मंगल मैत्रेय बुध्द विहाराच्या कोनशिलेचे अनावरण
जळगाव शहरातील वाघनगर चौक रुक्मिणी नगर, यशवंत भवन परिसरात मंगल मैत्रेय बुध्द विहराच्या कोनशिलेचे अनावरण व बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. धम्म परिषेदेचे उदघाटन व कोनशिला अनावरण भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष ऍड.भीमराव आंबेडकर यांच्याहस्ते रविवारी पार पडले. यावेळी भन्ते अशोक किर्ती थेरो, भन्ते दीपंवरजी थेरो, भन्ते बी. संघपाल, भन्ते धम्मदिप, धम्मदूत डी.एस.तायडे, भारतीय बौध्द महासभेचे राज्याध्यक्ष यु.जी.बोराडे, एस.के.भंडारे, राष्ट्रीय महासचिव जगदिश गवई आदींची उपस्थिती होती. ऍड.भीमराव आंबेडकर यांची फुलांनी सजविलेल्या रथावर विराजमान करुन शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा श्रीधरनगर, रुख्मिणीनगर, राजीव गांधीनगर, वाघनगर चौकामार्गे मंगलमैत्रीय महाबुद्ध विहार परिसरात शोभायात्रची सांगता करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष  शहरातील या शोभायात्रेत भंते कौंण्डन्य यांच्यासह जळगाव,धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष, महिला उपासिका व पुरुष उपासक रॅलीत सहभागी झालेले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT