उत्तर महाराष्ट्र

Loksabha 2019 : प्रशासनाकडून 26 उमेदवारांना नोटिसा 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः सोशल मीडियावरून जाहिराती "व्हायरल' करण्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी न घेतल्याने लोकसभेच्या जळगाव व रावेर मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी या नोटिसा बजावल्या आहेत. 
लोकसभेच्या रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे, राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीचे अजित तडवी, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे रोहिदास अडकमोल यांना, तर जळगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर, भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील, अपक्ष उमेदवार ईश्वर मोरे, वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. 

...अन्यथा निवडणूक खर्चात समावेश 
उमेदवारांनी त्रयस्थ व्यक्तींना निवडणुकीच्या प्रचारासाठी एसएमएस, जाहिराती, प्रसिद्ध करण्यापूर्वी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक आहे. याची आपणांस माहिती असताना परवानगी न घेता सोशल मीडियावरून जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याबाबत तत्काळ परवानगी घ्यावी; अन्यथा हा खर्च निवडणूक खर्च धरला जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: राही सरनोबतचा एक 'निशाणा' चुकला अन् भारताचे पदक गेलं; 'Frame hit' चा फुल ड्रामा, ५५ हजार भरून अपील केले पण...

बाबो! विद्या बालनने सगळ्यांसमोर पती सिद्धार्थला केलं किस, रोमँटिक लिपलॉकचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : अंबाला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ६ वर

SCROLL FOR NEXT