live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

सायकलिंग करणाऱ्या अधिकाऱ्याने आणला शिक्षणाचा कारभार चव्हाट्यावर! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः सायकल चालविणे हा सर्वांत चांगला व्यायाम म्हटले जाते. सायकलींगद्वारे कोणीही जागरूक नागरिक म्हणून कार्य करू शकतात. याचे उदाहरण येथील जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांचे देता येईल. सायकलिंग करताना त्यांना एका शाळेचे विद्यार्थी ताटकळत उभे दिसले. त्यांनी शाळेत जाऊन पाहिले असता जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक दररोज उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतीक्षा करावी लागते हे लक्षात आले. श्री. पाटील यांनी लागलीच जिल्हा परिषदेच्या "सीईओं'ना हा प्रकार लक्षात आणून शिक्षण विभागाची पोलखोल केली. 
सायकल चालविणे हा उत्तम प्रकारचा व्यायाम आहे. यामुळे नियोजन अधिकारी पाटील यांनी 4 ऑगस्ट 2016 पासून सायकलिंग सुरू केली. आतापर्यत त्यांनी 635 दिवस नियमित सायकली चालविली आहे. 14 हजार 390 किलोमीटरचे अंतर पार केले आहे. त्यामुळे त्यांचे वजनही कमी झाले आहे. पूर्वी 90 किलो वजन होते ते 80 किलो झाले आहे. 
श्री. पाटील दररोज वीस ते पंचवीस किलोमीटर सायकल चालवितात. नुकतेच ते सकाळी सायकलिंग करीत धानोरा बुद्रूक (ता. जळगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरून जात होते. त्यांनी शाळा बंद अन विद्यार्थी बाहेर उभे असलेले दिसले. त्यांनी शाळेत सायकलीसह जाऊन विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढली. शाळेतील शिक्षक रोज उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांना अर्धा ते पाऊण तास बाहेर थांबावे लागत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी लागलीच ही माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांना दिली. त्यांना गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळेत पाठविले. माहिती खरी असल्याचे समजताच शिक्षकांसह केंद्रप्रमुखांचे एक महिन्याचे वेतन कपात व एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले. 

असे आहेत सायकलींगचे फायदे ः 
- वजन कमी करण्यासाठी उपयोग 
- रक्तदाब योग्य ठेवण्यामदत होते 
- हृदयाची गती उत्तम ठेवता येते 
- कर्करोगाचा धोकाही दूर राहतो 
- सायकलिंगमुळे डायबिटीजवर नियंत्रण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT