rapid testing 
उत्तर महाराष्ट्र

"रॅपिड टेस्टिंग'साठी जळगाव जिल्ह्यात लवकरच केंद्राचे पथक

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोना' संसर्गाचे वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारने देशातील सहा जिल्ह्यांची निवड "रॅपिड टेस्टिंग'साठी केली आहे. त्यात जळगावचाही समावेश आहे. लवकरच केंद्राचे पथक "रॅपिड टेस्टिंग' वाहनासह दाखल होऊन कोणत्याही गावात तपासणी करणार आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 199 रुग्ण "कोरोना पॉझिटिव्ह' आढळून आले. त्यातील 25 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण जळगाव जिल्ह्यात आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्याची "रॅपिड टेस्टिंग'साठी निवड करण्यात आली आहे. जसे दुष्काळाच्या पाहण्यासाठी केंद्राचे पथक येते, कोणत्याही गावाची पाहणी करते, निरीक्षण नोंदविते, त्याबाबतचा अहवाल केंद्राला देते; त्याप्रमाणे केंद्राचे "रॅपिड टेस्टिंग' पथक जळगाव जिल्ह्यात येईल. 

या बाबींचा करतील अभ्यास... 
कोणत्याही तालुक्‍यातील कोणत्याही गावांना जाऊन नागरिकांची रॅपिड तपासणी करतील. रुग्ण "कोरोना'बाधित होण्याचे प्रमाण, कशामुळे बाधित होतात, नेमक्‍या कारणांचा शोध, जर बाधित न झालेल्या भागात पथकाने तपासणी केली, तर त्या भागाचा अभ्यास, नागरिकांनी "कोरोना'बाबत घेतलेली काळजी, तेथील परिस्थितीचा अभ्यास पथक करून निरीक्षणे नोंदवतील. बाधित व बाधित न होण्याची कारणे, आरोग्य यंत्रणा, पोलिस व जिल्हा प्रशासनाने घेतलेली दक्षता, केलेल्या उपाययोजना, काय कमी- काय जास्त यांचाही अभ्यास समिती करेल. यावरून जिल्ह्यात नेमक्‍या काय उपाययोजना करायला हव्यात, त्याबाबतची माहिती केंद्र शासनाला सादर होईल. त्यावर उपाययोजना, दक्षतेच्या अनुषंगाने केंद्र शासन राज्याला, राज्य जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन करेल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT