petrol. 
उत्तर महाराष्ट्र

पेट्रोल, डिझेल विक्रीत एवढे टक्के घट !

सकाळवृत्तसेवा

 जळगाव : "लॉकडाउन'च्या काळात पेट्रोल, डिझेल बंदीवर निर्बंध आणण्यात आले होते. केवळ अत्यावश्‍यक सेवांनाच पेट्रोल मिळत असे. आता मात्र बहुतांश कंपन्या, एकल दुकाने सुरू असल्याने पेट्रोलची मागणी वाढली. मात्र, पासेस नसल्याने वाहनधारकांना पेट्रोल दिले जात नाही. पासेसअभावी पेट्रोल, डिझेल विक्री 30 टक्‍क्‍यांवर आली आहे. सत्तर टक्के घट शहरातील पेट्रोलपंपावर झाली आहे. 
लॉकडाउनच्या काळात पेट्रोल, डिझेल विक्रीची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात अशी दिली आहे. त्यात पासेस असणाऱ्यांनाच पेट्रोल, डिझेल द्यावेत असे आदेश आहे. पासेस सर्वांजवळ नसतात. त्यात कंपन्या सुरू झाल्या आहेत. शासकीय कार्यालयात उपस्थिती वाढू लागली आहे. अनेक खासगी प्रतिष्ठाने सुरू आहेत. अनेक जण अत्यावश्‍यक सेवा देताहेत. सर्वांकडे पासेस नसतात. यामुळे पेट्रोलपंपावर वाहनधारक व पेट्रोल पंपचालक यांच्यात वाद होताहेत. यामुळे पेट्रोल पंपावर सरसकट सर्वांना विनापासेस पेट्रोल देण्याची मागणी पंपचालकांची आहे. 

पासेसमुळे पेट्रोलच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. शहरात पूर्वी रोज साठ हजार लिटर पेट्रोलचा खप होता, तो आता वीस हजार लिटरपर्यंत खाली आला आहे. पेट्रोल पंपचालकांना मजुरांचा पगार, लाइट बिल इतर खर्च द्यावाच लागतो. कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने पेट्रोल उडण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे पेट्रोलमध्ये शॉर्टेज येते. तेही नुकसान येते. अनेक वाहनाधारकांकडे पासेस नसल्याने त्यांना पेट्रोल देता येत नाही. याचा एकत्रित परिणाम पेट्रोल पंप व्यवसायावर झाला आहे. लॉकडाउन अजून किती काळ सुरू असेल, सर्वच दुकाने, उद्योग सुरू होतील किंवा नाही हे सांगता येत नाही. मात्र, नागरिकांना कामासाठी वाहनाने जावेच लागते. त्यांना पेट्रोल मिळावे, ते पासेसविना परत जाऊ नये, अशी अपेक्षा पंपचालकांची आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

Maharashtra Board: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Social Media Ban: तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद; युरोपीय आयोगाने ‘इयू किड्स ॲक्ट’ स्वीकारला

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

SCROLL FOR NEXT