उत्तर महाराष्ट्र

जन्मदात्याचा मृतदेह स्वीकारण्यास मुलाचा नकार 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : अंत्यदर्शन, मृतदेहाला खांदा देत मुलगा मुखाग्नी देतो, त्यानंतर मृतात्म्यास चिरशांती लाभते, अशी भावना आहे. मात्र, वृद्धापकाळाची काठी असलेल्या वारसाने आज पित्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जिवंतपणी कोणतीच जबाबदारी घेतली नाही. मात्र, अंत्यसंस्कारही करण्यास मुलगा नकार देतो म्हणून नाइलाजास्तव खाकीतील माणुसकीचे दर्शन घडवत पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने या वृद्धावर अंत्यसंस्कार केले. 
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, सोमवारी (ता. 6) गिरणा नदीजवळील जकात नाक्‍याजवळ एका 60 वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आला होता. तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करून मृताची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलिस नाईक मगन मराठे यांनी तपासाची चक्रे फिरवल्यावर मृताचे नाव धर्मपाल असून, तो भुसावळ शहरातील शेरेपंजाब हॉटेल आणि जळगावातील मराठा मटण हॉटेल याठिकाणी वेटरचे काम करत होता, अशी माहिती मिळाली. यानंतर त्यांनी धर्मपाल वेटरचा मुलगा निखिल ऊर्फ नितीन याचा शोध घेत त्याचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्याला व्हॉट्‌सऍपवरून मृतदेहाचे छायाचित्र पाठवून ओळखदेखील पटवली. मुलाने वडिलांना व्हॉटस्‌ऍपवरुनच ओळखले, त्यानंतर पोलिसांनी मृतदेह स्वीकारण्यासाठी नातेवाईक म्हणून मुलाला विनंती केल्यावर नाशिक येथे राहणाऱ्या निखिलने आपण वडिलांचा मृतदेह घेण्यासाठी उद्या (ता.7) येतो म्हणून सांगितले. मात्र 48 तास होऊनही तो आलाच नाही. पोलिसांनी वारंवार संपर्क साधूनही उपयोग होईना. अखेर त्याने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने पोलिसांपुढील पेच वाढला. अखेर पोलिसांनी धर्मपाल काम करीत असलेल्या मराठा मटण हॉटेलच्या मालकांना संपर्क केल्यावर विजय महाजन यांच्या सहकार्याने आज त्यांच्यावर नेरीनाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मुलास फुटला नाहीच पाझर 
निखिल ऊर्फ नितीन हा नाशिक येथे कुटुंबासह वास्तव्यास आहे. तो जळगावी राहत असतानाच त्याच्या आई-वडिलांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. दोघे विभक्त झाल्यावर नितीनने जळगाव सोडून नाशिक येथे बस्तान हलवले तेव्हापासून तो तेथेच राहतो. मंगळवारपर्यंत हो सांगणाऱ्या नितीनने अखेर मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने नाइलाजास्तव पोलिसांना अंत्यस्काराची जबाबदारी पार पाडावी लागली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT