sunil gaikwad 
उत्तर महाराष्ट्र

डीआरडीएचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेले सुनील गायकवाड यांचे आज सकाळी साडेआठच्या सुमारास दिर्घ आजाराने निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून ते इलाज करण्यासाठी रूग्णालयात दाखल होते. 
नाशिक येथील मुळचे रहिवासी असलेले सुनील मोतीराम गायकवाड हे जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या जिल्हा ग्रामीण यंत्रणा विभागात ते गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. यापुर्वी त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चार वर्ष काम सांभाळले आहे. 1993 साली त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे वर्ग 1 या पदासाठी निवड करण्यात आली होती. यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी काम केले आहे. 

याठिकाणी केले आहे काम 
सुनील गायकवाड यांनी अनेक ठिकाणी आपल्या कामाची छाप सोडली आहे. दरम्यान त्यांनी अहमदनगर येथे डीआरडीएचे प्रकल्प संचालक, नाशिक, वर्धा आणि जळगाव येथे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी, याशिवाय गटविकास अधिकारी म्हणून भुसावळ, चोपडा व सटाना येथे काम केले आहे. जळगाव जिल्हा परिषदेत ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून बढती घेवून ते अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्‍त झाले होते. येथून ते नाशिक येथे उपायुक्‍त म्हणून त्यांची पदोन्नतीवर बदली झाली होती. यानंतर त्यांची जळगाव डीआरडीए या पदावर 2018 पासून कार्यरत होते. 

लिव्हरचा आजाराने निधन 
सुनील गायकवाड यांना लिव्हरचा त्रास होता. नाशिक येथील एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर लिव्हर ट्रान्सफर्टची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यातून बरे झाल्यानंतर ते ड्युटीवर जॉईन झाले होते. दोन महिन्यापुर्वी गायकवाड यांच्याकडे जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला होता. परंतु आठ दिवस काम सांभाळल्यानंतर त्रास होवू लागल्याने उपचारासाठी मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते. नंतर नाशिक येथे उपचारासासाठी दाखल केले असताना आज (ता.13) उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

SCROLL FOR NEXT