उत्तर महाराष्ट्र

फिटनेस फंडा : ए. टी. नानांच्या तंदुरुस्तीत चालणे, योगाचे योगदान! 

सकाळवृत्तसेवा

खासदार ए. टी. पाटील. सलग दुसऱ्यांदा जळगाव मतदारसंघातून खासदार झालेल्या ए. टी. नानांचा त्यांची तंदुरुस्ती व व्यक्तिमत्त्वावरून लोकसभेत "दक्षिणेतील अभिनेता' म्हणून गमतीने उल्लेख होतो; परंतु त्यांच्या या तंदुरुस्तीमागे पहाटे नियमित उठून चालण्यासह योगासने, प्राणायाम आणि संतुलित आहार हे घटक आहेत. अगदी मतदारसंघात फिरतानाही ते सोबत जेवणाचा डबा ठेवतात. रात्री उशीर झाला तर फळे, दूध घेऊन विश्रांती घेतात. त्यातून त्यांनी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती राखलीय... 
 

खासदार ए. टी. पाटील सुरवातीपासूनच आपल्या स्वास्थ्याविषयी कमालीचे जागरूक आहेत. खासदार होण्यापूर्वी ते पारोळ्याचे नगराध्यक्ष होते. विधान परिषदेची निवडणूकही त्यांनी लढविली होती. राजकारणात असल्यामुळे नेहमीच निवासस्थानी कार्यकर्त्यांची गजबज. खासदार झाल्यापासून गेल्या नऊ- दहा वर्षांत तर त्यांच्या कामांचा व्याप अधिकच वाढला. संसदेचे अधिवेशन, विविध समित्यांवर असल्याने त्या समित्यांच्या बैठकांसाठीही सारखे दिल्लीला जावे लागते. शिवाय, लोकसभा मतदारसंघ असल्याने त्याची व्याप्ती, संपर्क, रोज कार्यकर्त्यांसह नागरिकांशी संपर्क व संवाद यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. त्यातून तणावाचे प्रसंगही निर्माण होते. त्यासाठी ए. टी. नानांनी प्रकृतीवर विशेष भर दिला आहे. 
पहाटे पाचला उठून फ्रेश झाल्यानंतर रोज दोन किलोमीटर चालणे, नंतर काही योगासने व प्राणायाम करणे, सकाळी साडेआठपर्यंत तयार होऊन पोहे, उपमा, उसळ असे पदार्थ नाश्‍त्याला असतात. चहा शक्‍यतो टाळणे, घेतला तरी कमी साखरेचा व मर्यादित. दुपारचे जेवण एक ते दोनच्या दरम्यान. मतदारसंघात दौऱ्यावर असले तरी घरून जेवणाचा डबा सोबत घेतला जातो. रोजच्या जेवणात पालेभाज्या, पोळी. क्वचित वेळा मसाल्याची भाजी असते. सायंकाळी थोडा चहा, भूक असेल तर नाश्‍ता. रात्रीचे जेवण आठ ते नऊदरम्यान; परंतु, रात्रीच्या जेवणात हलका आहार. घरी येण्यास रात्री उशीर झाला तर केवळ फळे अथवा दूध घेऊन झोपणे, असा ए. टी. पाटलांचा दिनक्रम असतो. हलका व्यायाम, प्राणायाम आणि संतुलित आहारामुळे नानांची प्रकृती ठणठणीत आहे. वेळ मिळाल्यानंतर काही आवडत्या पुस्तकांचे वाचन, जुन्या चित्रपटातील गीते ऐकणे, हा छंदही आपले मानसिक आरोग्य राखतो, असे नाना आवर्जून सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT