corona positive 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव ब्रेकिंग : पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह, रेडझोनकडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : संपूर्ण देशात कोरोना कहर सुरु असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून कोरोनाच्या ग्रस्तांची संख्या 11 वर पोहचली आहे. त्यामूळे जळगाव जिल्ह्याची वाटचाल ही रेडझोनकडे होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 


जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून दररोज कोरोनाचे संशयीत रुग्ण जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी अमळनेर येथील दाम्पत्याला कोरोना सदृष्य लक्षणे जाणवत होते. त्यांना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ता. 20 रोजी त्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या महिलेसह तीच्या पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्या दाम्पत्याच्या कुटूंबियांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 20 जणांना शाहू महाराज रुग्णालयात क्‍वांरनटाईन करण्यात आले होते. 

एकाच कुटूंबातील पाच जणांना कोरोनाची लागण 
अमळनेर तालुक्‍यातील साळीवाडा परिसरातील दाम्पत्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्याच्या कुटूंबियांचे स्वॅब दोन दिवसांपूर्वी तपासणीसाठी धूळे येथे पाठविण्यात आले होते. आज दुपारी त्यांचा अहवाल प्राप्त झाले असून त्यांच्या कुटूंबातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 

प्रशासन पुन्हा हादरले 
एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोना मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आज अमळनेर तालुक्‍यातील एकाच कुटूंबातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाला हादरा बसला आहे. 

जिल्ह्याची वाटचाल रेड झोनकडे 
जिल्ह्यात कोरोनाचे केवळ दोन रुग्ण असल्याने त्यातील एकाचा मृत्यू झाला होता, तर दुसरा रुग्ण बरा झाला होता. त्यामूळे जिल्ह्या हा ग्रीन झोनमध्ये येणार होता. मात्र अमळनेर तालुक्‍यात एकापाठोपाठ चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याने ऑरेंज झोनमध्ये प्रवेश केला. परंतू आता एकाच वेळी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 11 वर पोहचली आहे. त्यामूळे जळगाव जिल्ह्याची वाटचाल ही रेडझोनकडे होत असल्याची चित्र सध्या दिसून येत आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT