उत्तर महाराष्ट्र

शिक्षकाची सामाजीक बांधिलकी...मुलीच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान अन्‌ रक्तदान!

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः पिंप्राळा उपनगरातील संजीवनीनगर भागातील रहिवासी पवार दाम्पत्यांनी मुलगी दुर्वा हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त 100 गरीब, गरजू व फूटपाथवरील निराधारांना "सोशल डिस्टन्स' ठेवून अन्नदान केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताची आवश्‍यकता असल्याने शिक्षक कुणाल पवार यांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने लेकीचा वाढदिवस साजरा केला. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर 14 एप्रिलपर्यंत ठप्प झाले आहे. देशात लॉकडाउन जरी आवश्‍यक असले, तरी या निर्णयामुळे अनेक गरजू व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली आहे. श्रीमंतांनी घरात किराणा साहित्याचा मोठा साठा करून ठेवला असला, तरी फूटपाथवरील गरीब गरजू व निराधारांचे काय? तसेच ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांचेही वांदे झाले आहेत. काम केल्याशिवाय अनेकांची चूल पेटत नाही. अशा लोकांची संख्याही सर्वाधिक आहे. 

अशा परिस्थितीत पिंप्राळा उपनगरातील संजीवनीनगर भागातील पवार दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी जपत 100 गोरगरीब- गरजूंना अन्नाचे पॅकेट तयार करून वाटप केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व काळाची गरज ओळखून कुणाल पवार यांनी रक्तदान केले. यावेळी त्यांनी मुलीचा प्रत्येक वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचा संकल्प करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमासाठी आई, वडील, भाऊ, वहिनी, पत्नी यांचे उत्तम सहकार्य लाभल्याचे कुणाल पवार यांनी सांगितले. 

मुलीच्या वाढदिवसानिमित्त लॉकडाउन कालावधीत आपल्या परीने जेवढे शक्‍य होईल तेवढे अशा 100 गोरगरीब, गरजूंना अन्नदान केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व काळाची गरज लक्षात घेऊन रक्तदानही केले. यावेळी आम्ही दोघांनी मुलीचा प्रत्येक वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचा संकल्प केला आहे. 
- कुणाल पवार, शिक्षक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT