live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

जळगावमधून "मुन्नाभाई एमबीबीएस' अटकेत 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नॅचरोपॅथी क्‍लिनिकच्या नावे रुग्णांची तपासणी औषधोपचार आणि हातोहात शस्त्रक्रिया, मलमपट्टी करून रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडलेल्या बोगस डॉक्‍टर जुबेर खाटीक याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. 
जळगावसह तालुक्‍यातील म्हसावद येथे अशाच पद्धतीने एका रुग्णाच्या मूळव्याधीवर अघोरी पद्धतीने शस्त्रक्रिया करून त्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेत पाठविण्याचे काम या बोगस डॉक्‍टरने केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यातील संशयिताने मेहरुणमध्ये दुकान थाटून धंदा सुरू केल्याच्या माहितीवरून पोलिस आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून त्यास अटक केली आहे. 

डॉक्‍टरची पार्श्‍वभूमी 
कुऱ्हाडदे (ता. जळगाव) येथील जितेंद्र रामा धनगर, यांना मुळव्याधीचा त्रास असह्य झाल्याने त्यांनी म्हसावद येथे डॉ. जाकीर सत्तार खाटीक यांच्याकडे गेले होते. डॉ. खाटीक याने भूलचे इंजेक्‍शन टोचून त्यांच्यावर (23 जुलै 2018 रोजी) शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर औषधोपचार केल्यानंतर जितेंद्र धनगर यांची प्रकृती खालावून तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. खाटीक याने केलेल्या अघोरी पद्धतीने शस्त्रक्रिया केल्याने त्यात सेप्टिक होऊन जिवावर बेतल्याचे आढळून आल्यावर या प्रकरणी रुग्णाच्या कुटुंबीयांनी आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय दगडू चव्हाण यांनी तक्रार दिल्यावरून औद्योगिक वसाहत पोलिसांत कथित डॉ. जाकीर खाटीक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे करीत आहे. 

अचानक छापा 
पोलिसांत जाकीर खाटीक या बोगस डॉक्‍टरवर गुन्हा दाखल होऊनही त्याचा धंदा सुरूच होता. म्हसावदनंतर तो चक्क जळगाव शहरात मेहरुणच्या शेरा चौकात उपचारासाठी येत होता. मूळव्याध चिकित्सालय म्हणून त्याने दुकान टाकून सकाळपासूनच रुग्ण तपासणी व उपचारास सुरवात केल्याची माहिती कळताच निरीक्षक रणजित शिरसाठ, उपनिरीक्षक योगेश शिंदे, तालुका आरोग्याधिकारी संजय चव्हाण, आरोग्य विस्तार अधिकारी ज्ञानेश्‍वर पाटील, चुनिलाल मोतीराया यांच्यासह उपनिरीक्षक विशाल वाठोरे, माधुरी बोरसे, महेंद्रसिंग पाटील, संदीप पाटील, मिलिंद पाटील यांच्या पथकाने छापा टाकला. 
 
ना डिग्री... ना प्रशिक्षण 
डॉ. जाकीर सत्तार खाटीक याच्याकडे कुठल्याच विद्याशाखेची पदवी नाही, वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्र किंवा तत्सम अधिकृत प्रशिक्षण घेतलेले नाही. असे असताना तो रांगेने मूळव्याधीच्या शस्त्रक्रिया करीत होता. एम.डी. सर्जनच्या रुग्णालयात जशी व्यवस्था असावी, तशीच त्याने क्‍लिनिकमध्ये करून ठेवलेली होती. महागडे इंजेक्‍शन, भूल देण्याची सामग्री, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, औषधी आणि मलमपट्टीचे साहित्य पथकाने ताब्यात घेतले असून, रीतसर पंचनामा करण्यात आलेला आहे. 
 
बोगस डॉक्‍टरची कट प्रॅक्‍टिसही 
कथित डॉ. जाकीर खाटीक याच्या टेबलावर पथकाला शहरातील नामवंत पॅथेलॉजींचे लेटर हेड, मोठ्या सर्जनचे प्रिस्क्रिप्शन पॅड, उपचारादरम्यान रुग्णाची प्रकृती खालावल्यावर खऱ्याखुऱ्या डॉक्‍टरांकडे पाठवण्याची यंत्रणाही त्याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT