उत्तर महाराष्ट्र

शिक्षावाढीची मागणी करणारी याचिका करून घेतली दाखल 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पालिकेच्या गाजलेल्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणात सरकार पक्षाने आरोपींच्या शिक्षेत वाढ करण्यासंबंधी केलेली याचिका खंडपीठाने दाखल करून घेतली आहे. त्यामुळे आता या शिक्षावाढीच्या मागणीच्या याचिकेसह आरोपींच्या जामीन अर्जावर एकत्रितपणे न्या. टी. व्ही. नलावडे यांच्या पीठासमोर सुनावणी होईल. आज ही याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने 26 सप्टेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. 

जळगाव पालिकेच्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणात धुळे न्यायालयाने सुरेशदादा जैन, माजीमंत्री गुलाबराव देवकर, प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह चाळीसवर आरोपींना दंडासह शिक्षा सुनावली. जैन, राजा मयूर, नाना वाणी वगळता अन्य आरोपींनी दंडाची रक्कम भरत जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. सुरवातीला न्या. बोरा यांच्यासमोर हे प्रकरण आल्यानंतर त्यांनी "नॉट बिफोर मी' केल्याने ते न्या. व्ही. के. जाधव यांच्या पीठाकडे वर्ग झाले. 

सरकार पक्षाचा अर्ज 
दरम्यान, धुळे न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेत वाढ करावी, अशी मागणी करणारा अर्ज सरकार पक्षातर्फे ऍड. अमोल सावंत यांनी दाखल केला होता. खंडपीठाने हा अर्ज आज दाखल करून घेतला. मागणीत तथ्य असल्याने अर्ज दाखल करून घेतल्याचे मानले जात असून, त्यामुळे आता शिक्षावाढीच्या मागणी करणाऱ्या याचिकेसह आरोपींच्या जामिनावरही न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. के. के. सोनवणे यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे. शिक्षावाढीच्या मागणीचा अर्ज दाखल करून घेतला नसता तर जामिनावरील सुनावणी न्या. जाधव यांच्या पीठासमोर झाली असती. याप्रकरणी पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला होणार असून, त्याकडे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT