उत्तर महाराष्ट्र

आधार लिंकिंग नसल्यास धान्यपुरवठा बंद; शासनाचा इशारा

रमाकांत घोडराज

धुळे : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानदाराकडे आधार सीडिंगचे काम पूर्ण करून घ्यावे. आधार लिंकिंग नसल्यास फेब्रुवारी-२०२१ पासून संबंधितांचा अन्नधान्य पुरवठा थांबविण्यात येईल, अशा कडक सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आधार लिंकिंगचे काम पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे. 
 

२२ डिसेंबर २०२० ला शासनाने दिलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी खास मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल लिंकिंग करणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्यांना कुठेही जाण्याची गरज नसून आपापल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे आधारकार्डची छायांकित प्रत व अंगठा दिल्यास e-KYC द्वारे आधार सीडिंग होणार आहे. धुळे जिल्ह्यात दोन लाख १७ हजार लाभार्थ्यांचे आधार सीडिंग बाकी असून, ते तातडीने पूर्ण करण्यासाठी खास मोहीम घेण्यात आली आहे. जे लाभार्थी अस्तित्वात नाहीत किंवा सुमारे दोन-तीन महिन्यांपासून ज्यांनी धान्याची उचल केलेली नाही, अशा सर्व लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद करण्याच्या शासनाचा सूचना आहेत. त्याची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे श्री. मिसाळ यांनी म्हटले आहे. 

लाभार्थ्यांशी संपर्क साधा 
याबाबत सर्व तहसीलदारांनी आपल्या स्तरावर बैठका घेऊन स्वस्त धान्य दुकानदारांना माहिती व प्रशिक्षण दिले आहे. ११ जानेवारी २०२१ ला स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी व पुरवठा अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही एकत्रित बैठक घेण्यात आली. त्यात सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आधार लिंकिंगच्या कामासाठी सकाळी आठ ते दुपारी बारा व तीन ते सायंकाळी सातपर्यंत स्वस्त धान्य दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी स्वत:हून लाभार्थ्यांशी संपर्क करून हे काम मुदतीत पूर्ण करावयाचे आहे. या कामात कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना दिल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी मिसाळ यांनी म्हटले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT