banana gulabrao patil 
उत्तर महाराष्ट्र

जिल्ह्यात लवकरच केळी संशोधन विकास महामंडळ : गुलाबराव पाटील  

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात देशातील सर्वाधिक केळी लागवडीचे क्षेत्र आहे. त्याच्या विकासासाठी जळगाव जिल्ह्यात लवकरच केळी संशोधन विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जिल्ह्याचे पाकलमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. जळगाव येथे झालेल्या केळी शेतकरी व शास्त्रज्ञ मंच सभेत ते बोलत होते. 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत केळी संशोधन केंद्र जळगाव येथील शेतकरी शास्त्रज्ञ मंच सभा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संशोधन केंद्राचे डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. व्ही डी. शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषीअधिकारी संभाजी ठाकूर, के. बी. पाटील आदी उपस्थित होते. 
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की ,कुठलेही काम करताना समाजसेवेचे व्रत म्हणून केल्यास लाभ होतो. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना याच भावनेतून मार्गदर्शन करावे. शेतकऱ्याची शेती फायद्यात येण्यासाठी व अधिक उत्पादनासाठी त्यांना आधुनिक तत्रंज्ञानाची माहिती द्यावी. केळी संशोधन केंद्राचेबळकटीकरण व विस्तारीकरणासाठी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासमवेत बैठक घेवून केळी संशोधन विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. यावेळी बोलतांना शेतीतज्ञ डॉ.के.बी.पाटील म्हणाले, कि जिल्ह्याचा दोन हजार कोटी रुपयांचा व्यापार हा केळी 
पिकावर अंवलबून आहे. केळी पिकावर येणाऱ्या रोगाचे निदान करण्यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा (पॅथॉलॉजी लॅब) या केंद्रात असणे आवश्‍यक आहे. कृषी उपसंचालक अनिल भोकरे म्हणाले, की जळगाव जिल्ह्याचा विकास दर वाढविण्याकरता केळी व कापूस पिकांचे महत्त्वाचे स्थान आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांचा अधिकाधिक विकास होण्यासाठी सर्वकेळी उत्पादक एकाच छताखाली आणणे आवश्‍यक आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात केळी विकास महामंडळ स्थापन होणे आवश्‍यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.वडोदा, ता. चोपडा येथील निर्यातक्षम केळी उत्पादक संदीप सुभाष पाटील म्हणालेकी, जे शेतकरी निर्यातक्षम केळी उत्पादन करतात त्यांना प्रोत्सहनात्मक अनुदान मिळावे. तसेच केळीच्या रोपांची किंमत कमी व्हावी. त्याच बरोबर शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करावा. प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांनी केळी संशोधन केंद्रातील केळी पिकाची पाहणी केली. तसेच अनुसूचित जाती जमाती (विशेष घटक योजनेअंतर्गत ) शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी केळी संशोधन केंद्राचे प्रा. एन. बी .शेख यांनी केळी संशोधन केंद्राबाबत संगणकीय सादरीकरण केले, किरण जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.या प्रसंगी नाबार्डचे जिल्हा समन्वय श्रीकांत झांबरे, केळी उत्पादक शेतकरी प्रंशात महाजन, केळी संशोधन केंद्र कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT