उत्तर महाराष्ट्र

गुलाबराव पाटील; पानटपरी चालक ते कॅबिनेट मंत्री 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार होत आहे. जळगाव जिल्ह्यातून शिवसेनेतर्फे उपनेते गुलाबराव पाटील यांचे कॅबिनेट मंत्रीपदी नाव निश्‍चित झाले आहे.कट्टर शिवसैनिकाला पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रीपदाची संधी दिली आहे. एक साधा पानटपरी चालक ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. 
गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते आहेत. आक्रमक वक्तृत्व हे त्यांचे वैशिष्ठ आहे. अत्यंत सर्वसाधारण घरातून ते आले आहे. पाळधी (ता.जळगाव)येथे पानटपरी चालवित असत. शिवसेना प्रमुख (कै.)बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे ते शिवसेनेत आले. शिवसैनिक म्हणून त्यांनी विविध आंदोलनात सहभाग घेतला. त्यांच्या आक्रमक शैलीतील वक्तृत्वामुळे जनतेत लोकप्रिय झाले. सन 1992 मध्ये ते एरंडोल पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आले.सन 1995ते 1999 या कालावधीत शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले. 1997मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य झाले. 1999 मध्ये एरंडोल विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे प्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर पुन्हा 2004 मध्ये त्यांनी याच मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. 2014 म्हणून ते तिसऱ्यांदा जळगाव ग्रामीण मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर युतीच्या मंत्रीमंडळात त्यांना सहकार राज्यमंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळाली. आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात त्यांना राज्याचा मंत्री होण्याची दुसऱ्यांदा संधी मिळत आहे. यावेळी त्यांना बढती मिळणार असून कॅबिनेटच्या मंत्रीपदावर त्यांची नियुक्ती होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT