ujjwal kumar chavhan 
उत्तर महाराष्ट्र

धामणगावचा सुपुत्र"ईडी'त "सुपर क्‍लासवन' 

अमोल भट

जळगाव : चाळीसगाव तालुक्‍यातील धामणगावचे सुपुत्र डॉ. उज्जवलकुमार चव्हाण यांनी प्रतिकूल स्थितीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आणि नंतर परिश्रमपूर्वक आयकर विभागात अधिकारी म्हणून नियुक्तीही मिळवली. आता प्रवर्तन निदेशालय अर्थात "ईडी"च्या कार्यालयात आयकर विभागाच्या सहआयुक्तपदी त्यांची पदोन्नती झाली असून, या नियुकीद्वारे ते "सुपर क्‍लासवन' अधिकारी झालेत. 
धामणगाव येथे जन्मलेल्या डॉ. चव्हाण यांच्या आई श्रीमती शोभा चव्हाण (निवृत्त शिक्षिका) यांनी उत्तम संस्कार तसेच परिस्थितीशी सामना करण्याचे, सामाजिक बांधिलकी जोपासनेचे बाळकडू लहानपणीच उज्ज्वलकुमार यांना दिले. मिरज येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातून पदवी संपादित केली.

पाणीप्रश्नासाठी आग्रही 
धामणगाव येथे पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून भेडसावत होता गेल्या कालावधीत शासकीय योजना, लोकसहभाग आदींच्या माध्यमातून प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शाश्वत उपाययोजना करण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार योजनेत गाव सहभागी होते या योजनेचे तत्कालीन उपसचिवांनी गावाला भेट देत ग्रामस्थांच्या सहभागाबाबत मार्गदर्शन करत सामाजिक ऐक्‍याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. चाळीसगावतील पाणीप्रश्नाबाबत विशिष्ट गावांची निवड करून त्यात लोकसहभागातून जलसंधारणाचे काम उभारण्यासाठी जलयोध्यांचा एक चमू डॉ. चव्हाण यांच्या नेतृत्वात नुकताच तयार करण्यात आला आहे. गावात गावकऱ्यांसह एकत्रित येत मनसंधारणातून जलसंधारणाचे उल्लेखनीय कार्य त्यांनी उभे केले असून, पाणीटंचाईशी सामना करणाऱ्या अनेक गावांसाठी जलदूत बनले आहेत. 

आजवरच्या वाटचालीत जन्मभूमीबद्दलची तळमळ मनात कायम आहे. पाणी बचत, नियोजन आदींचे आत्मभान जागृत करणे ही काळजी गरज आहे. या धर्तीवर धामणगावला एक रोल मॉडेल म्हणून साकारणे सुरू आहे. धामणगावचा हा विकास पॅटर्न नक्कीच सगळ्या गावांसाठी प्रेरणादायी ठरेल. 
- डॉ., उज्ज्वलकुमार चव्हाण, सहआयुक्त, आयकर विभाग 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT