brel lipi lecturer 
उत्तर महाराष्ट्र

"ब्रेल लिपी'तून प्रज्ञाचक्षूंना "साहित्य'दृष्टी 

अमोल भट

जळगाव : दृष्टिहीनांना ज्ञानाचे पंख देणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या संशोधनामुळे अनेक प्रज्ञाचक्षूंच्या जीवनात आशेचा किरण प्राप्त झाला. मराठी साहित्यही प्रज्ञाचक्षूंपर्यंत पोहोचावे म्हणून चाळीसगावच्या शिक्षकाने अशा अनेक दर्जेदार साहित्याची "दृष्टी' या लिपीतून उपलब्ध करून दिलाय. आंतरराष्ट्रीय ब्रेल लिपी दिनाच्या औचित्याने या किमयागार शिक्षकाच्या कार्याचे कौतुकच करावे लागेल. 
राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राष्ट्रीय अंधशाळेचे विशेष शिक्षक सचिन सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीतून अनेक कविता, दर्जेदार साहित्य आदी वैचारिक मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. अंध विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्य वाचनाची इच्छा असूनही सहजासहजी त्याना ते उपलब्ध होत नाही ही बाब राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राष्ट्रीय अंधशाळेचे विशेष शिक्षक सचिन सोनवणे यांनी ओळखून त्याच्यातील मराठी आणि साहित्याबद्दल न्युनगंडात भर पडू नये काही पुस्तके ब्रेल लिपीतून विकसित करत उपलब्ध करुन दिली आहेत. यात पु. ल. देशपांडेंची बटाट्याची चाळ, अखेर कमाई, याचक, मौन, सातवा, सहानुभूती, पाचोळा या कविताही साकारल्या असून त्यांचेही वाचन विद्यार्थी करीत आहेत. प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सदैव जपण्यासाठी स्लॅम बुक, यासह अब्राहम लिंकनचे मुख्याध्यापकास पत्र, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे संपूर्ण चरित्रही ब्रेल लिपीत सोनवणे यांनी साकारले आहे. 

ज्ञानज्योतीचे व्रत 
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या विशाखा व प्रवासी पक्षी या सुप्रसिद्ध कविता संग्रहातील कणा व जालियनवाला बाग यासह अनेक कविता, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील की जीवनी या जीवनपटावर आधारित हिंदी कोलाज ब्रेल लिपीत साकारुन या विद्यार्थ्यांचे आयुष्य ज्ञानज्योतीने प्रकाशमय करण्याचा प्रयत्न सोनवणेंनी केला आहे. यामुळे केवळ अभ्यासाच्या पुस्तकात रमणाऱ्या या विद्यार्थ्यांमध्ये आता मराठी साहित्याचीही गोडी निर्माण होत आहे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT