bike_thief loan 
उत्तर महाराष्ट्र

जुगाराचे कर्ज फेडण्यासाठी दुचाकी चोरी 

सकाळ वृत्तेसवा

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीतील तरुणाला जुगाराचा नाद जडला आहे. जुगार खेळण्यासाठी छोट्या-मोठ्या चोऱ्या करुन त्यातून आपला नाद तो भागवत होता. जुगारात झालेले 25 हजारांचे कर्ज फेडण्यासाठी या तरुणाने चक्क गल्लीतील दुचाकी चोरल्याचे आढळून आले. सीटीव्ही फुटेज मध्ये संशयीत तरुणाची ओळख पटवून गुन्हेशाखेने त्याला अटक केली. 

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतून बुधवार(ता.22) अज्ञात चोरट्याने होंडा ऍक्‍टीव्हा दुचाकी (एमएच.19बीडब्लू 0503)चोरुन नेली होती. एमआयडीसी पेलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.चोराचा शोध घेत असतांना गुन्हेशाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलीत करुन परिसरातील तरुणांना फुटेज दाखवल्यावर दुचाकी नेणाऱ्या तरुणाची ओळख पटली. प्रशांत रविंद्र हेमणानी (वय-25 कंवर नगर) हा तरुण दुचाकी घेवुन जातांना ओळख पटल्यामुळे गुन्हेशाखेचे निरीक्षक बापु रोहोम यांच्या पथकातील संजय हिवरकर, प्रमोद लाडवंजारी, राजेश मेंढे, किरण धनगर, अशांच्या पथकाने प्रंशात ला ताब्यात घेतले सुरवातील उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या प्रमोदला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

जुगाराचे कर्ज फेडण्यासाठी चोरी 
प्रशांत हेमलणानी हा चांगल्या घरातील तरुण असून त्याला जुगाराचे नाद आहे. जुगार खेळण्यासाठी सुरवातील घरातून लहान मोठ्या चोऱ्या करुन तो जुगार खेळत होता. तरी त्याच्यावर 25 हजारांचे कर्ज शिल्लक असल्याने त्याने दुचाकी चोरण्याचा निर्णय घेतला. चोरलेली ऍक्‍टीव्हा दुचाकी 15 हजारात विकण्याच्या तयारीत असतांनाच पोलिसांनी त्याला अटक केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain Alert: कर्जत घाटात दरडींचा तडाखा; मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प, १६ गाड्या रद्द

U19 IND vs SL : ९ चौकार अन् १ षटकार... द्रविडच्या लेकाची जोरदार फटकेबाजी; पण श्रीलंकेने सामना जिंकत केली ODI मालिकेत बरोबरी

Thane Rain Red Alert: ठाण्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; सर्व गडकिल्ले, धबधबे व पर्यटनस्थळांवर पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी

Latest Marathi News Live Update: निदा खानला अखेर जामीन मंजूर

Raigad Ratnagiri Traffic: बार्जेसची धडक बसून सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद; रायगड-रत्नागिरी दळणवळण ठप्प

SCROLL FOR NEXT