cotton seeds 
उत्तर महाराष्ट्र

बीटी कपाशीची 25 लाख पाकिटे मागविणार 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात यंदा खरिपाच्या हंगामात कपाशीच्या लागवडीत 20 टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. मॉन्सूनपूर्व कापसाचे चांगले उत्पादन येईल. कापसाला चांगला भावही राहील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली. गतवर्षी पाच लाख 10 हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. यंदा ती 25 लाख 25 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर होणार आहे. 
देशभरात "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन' सुरू आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच बंद आहे. शासनाने कृषीसंबंधित सर्व कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी खरिपाची नांगरणी करून शेत मॉन्सूनपूर्व हंगामासाठी, तसेच मॉन्सूनसाठी तयारी करताना दिसत आहेत. 
शेतकरी व शेतीसंबंधित सर्व दुकाने, माल विक्रीसाठी बाजार समित्यांना "लॉकडाउन'मधून मुभा दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू, दादर, ज्वारी, हरभरा विकण्यास सोयीचे झाले आहे; त्याचबरोबर शेतकऱ्यांनी खरिपाची तयारीही सुरू केली आहे. 
गतवर्षी शासनातर्फे कापसाला चांगला भाव देण्यात आला. अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्याप घरात आहे. असे असताना येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीच्या लागवडीत 20 टक्के वाढ होईल. इतर पिकांपेक्षा कापसाला चांगला भाव मिळाला आहे. 

बियाण्यांचे वाटप 25 मेस 
शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व कपाशी हंगामाची तयारी केली असली, तरी शेतकऱ्यांना बीटी बियाण्यांचे वाटप 25 मेस होणार आहे. यंदा 25 लाख 53 हजार बीटी बियाण्यांच्या पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांना खतेही मिळतील. 

गुलाबी बोंडअळीचा धोका 
जून 2019 मध्ये पाऊस चांगला झाल्याने अजूनही अनेक शेतांमध्ये पाणी आहे. विहिरींचीही जलपातळी चांगली आहे. यामुळे शेतकरी मॉन्सूनपूर्व पेरणीकडे वळले आहेत. असे असले तरी आता जर कपाशीची लागवड केली तर गुलाबी बोंडअळीचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी एक जूननंतरच करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर यांनी केले आहे. 

कृषी आयुक्त 21 ला घेणार आढावा 
कृषी हंगामाबाबत जिल्ह्याचा आढावा, बियाणे, खतांच्या मागणीबाबत 21 एप्रिलला पुणे येथील कृषी आयुक्त "व्हीसी'द्वारे माहिती घेणार आहेत. खरीप हंगामाबाबत कर्ज, बियाणे, खते आदींचा आढावा ते घेतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT