ration kard 
उत्तर महाराष्ट्र

या कार्डधारकांनाही हवे मोफत धान्य

सकाळवृत्तसेवा

चाळीसगाव : ‘लॉकडाउन’च्या काळात सर्वत्र कामधंदे बंद असल्‍याने नागरिकांना अन्‍नधान्‍याचा तुटवडा होऊ नये म्हणून केंद्र शासनाने स्‍वस्‍त धान्‍य दुकानांवर केशरी कार्डधारकांसाठी गहू व तांदूळ उपलब्ध करून दिला आहे. मात्र, यासाठी केशरी कार्डधारकांना पैसे मोजावे लागत आहे. ज्याप्रमाणे अंत्योदय व प्राधान्य गटातील कार्डधारकांना मोफत धान्य उपलब्ध करून दिले, तसे केशरी कार्डधारकांनाही मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे तालुक्यातील निम्म्याहून अधिक केशरी कार्डधारकांनी या मालाची खरेदीच केलेली नाही. परिणामी, रेशन दुकानदारांकडे सद्यःस्थितीत केशरी कार्डधारकांना देण्यासाठी आलेला तब्‍बल पन्‍नास टक्‍के माल पडून आहे. 

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी तब्‍बल सहा आठवड्यांपासून सर्वत्र ‘लॉकडाउन’ पाळण्‍यात येत आहे. यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला असून गोरगरिबांच्या पोटाचा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी अंत्योदय व प्राधान्य कुटुंबीयांना (पिवळे रेशनकार्डधारक) माणशी पाच किलो तांदूळ मोफत उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार, एप्रिलचे वाटप पूर्ण झाले आहे. येत्या २० ते ३० मे दरम्यान पुन्हा मोफत तांदळाचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना मिळणार आहे. केशरीकार्डधारकांना २०१४ पासून रेशनदुकानांवर कुठला माल मिळत नव्हता. सध्याच्या ‘लॉकडाउन’मुळे शासनाने या कार्डधारकांनाही आता गहू व तांदूळ उपलब्ध करून दिला आहे. मात्र, त्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागत आहे. एक किलो गव्हासाठी आठ रुपये व तांदळासाठी बारा रुपये दर आकारला जात आहे. प्रत्येक माणशी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ दिला जात आहे. त्यानुसार, चाळीसगाव तालुक्यात २३ हजार ३०० केशरी कार्डधारकांसाठी ३ हजार ५६ क्‍विंटल गहू व २ हजार ३९ क्‍विंटल तांदूळ स्‍वस्त धान्‍य दुकानदारांकडे वाटपासाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, तब्‍बल बारा दिवस होऊनही हे धान्‍य घेण्यासाठी केशरी कार्डधारकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे रेशन दुकानांवर तब्‍बल निम्मेपेक्षा अधिक धान्‍य पडून आहे. 

मोफत धान्याची अपेक्षा 
शासनाकडून ज्‍याप्रमाणे पिवळ्या रेशनकार्डधारकांना मोफत तांदूळ उपलब्ध करून दिला आहे. त्याप्रमाणे केशरीकार्डधारकांना देखील मोफत वाटप धान्य वाटप होणार असल्याची सुरवातीला अफवा पसरली होती. प्रत्यक्षात असा कुठलाही लाभ केशरीकार्डधारकांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे. यावरून रेशनदुकानदार व ग्राहकांमध्ये बऱ्याचदा छोटे मोठे वादही होत असतात. आता तर केशरी कार्डधारकही आम्हालाही मोफत धान्य द्या, अशी मागणी दुकानदारांकडे करतात. मात्र, या कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून दिलेले असतानाही त्यांनी खरेदीसाठी पाठ फिरवल्याचे वास्तव चित्र तालुक्यात दिसून येत आहे. 

याच महिन्यात मिळणार 
मोफत डाळीचा लाभ 

केंद्र शासनाने अंत्योदय व प्राधान्य गटाच्या रेशनकार्डधारकांना एप्रिल ते जून असे तीन महिने मोफत डाळ रेशन दुकानांवरून देण्याचे निश्‍चित केले आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्यापपर्यंत एकाही रेशनदुकानावर डाळ उपलब्ध झालेली नाही. या संदर्भात येथील तहसील कार्यालयात संपर्क साधला असता, याच महिन्यात तांदळासोबत लाभार्थ्यांना मोफत डाळीचाही लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT