Marathi news Jalgaon market committee chairman shivsena
Marathi news Jalgaon market committee chairman shivsena 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव बाजार समिती सभापतीपद शिवसेनेकडे

सकाळवृत्तसेवा

जळगाव: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठीच्या निवडणूकीत शिवसेनेचे संचालक लक्ष्मण पाटील हे 14 मतांनी विजयी झाले आहेत. यामुळे बाजार समितीत सत्तांतर झाले आहे. सत्तेच्या किल्ल्या भाजपकडून शिवसेनेकडे आल्या आहेत. पाटील यांच्या चाहत्यांनी निवड जाहीर होताच जल्लोष केला. सकाळी अकराला बाजार समितीत संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहनिबंधक मुकेश बारहाते होते.

पवार यांची हरकत सभापती पदासाठी भाजपतर्फे प्रभाकर पवार यांनी तर शिवसेनेतर्फे लक्ष्मण पाटील, अनिल भोळे यांनी अर्ज दाखल केले होते. अनिल भोळे यांनी माघार घेतली. पवार यांनी लक्ष्मण पाटील यांच्या अर्जावर हरकत घेतली. पाटील हे व्यापारी व जिनिंग प्रेसिंग मिलचे मालक आहे. त्यांना सभापती होता येणार नाही. त्यावर सहनिबंधक बारहाते यांनी त्यांना लेखी उत्तर दिले. मात्र त्यांनी ते घेतले नाही.

यामुळे सभापतिपदासाठी लक्ष्मण पाटील व प्रभाकर पवार यांचे अर्ज शिल्लक होते. प्रत्यक्ष हात उंचावून झालेल्या निवडणुकीत संचालक लक्ष्मण पाटील यांना 14 मते मिळाली. भाजपचे उमेदवार प्रभाकर पवार, संचालक प्रभाकर सोनवणे, माजी सभापती प्रकाश नारखेडे यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. यामुळे पाटील यांना सभापती म्हणून घोषित करण्यात आले. संचालक कैलास चौधरी, लक्ष्मण पाटील, भरत पाटील, अनिल भोळे, सुरेश पाटील, विमलबाई भंगाळे, सरला पाटील, वसंत भालेराव, प्रशांत पाटील, सिंधूबाई पाटील, मनोहर पाटील, शशिकांत बियाणी, नितीन बेहडे, यमुनाबाई सपकाळे अशी एकूण 14 मते पाटील यांना मिळाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT