live photo 
उत्तर महाराष्ट्र

जळगावात तरुणाच्या खिशात मोबाईलचा स्फोट

सकाळवृत्तसेवा

जळगाव : खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने शहरातील एक इसम जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली असून, त्यास उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.

बाहेर जाण्यासाठी घरातून निघताना जळगावातील शनिपेठ परिसरामधील रहिवासी विकार खान शमीउल्ला खान (वय 42) यांनी आपला मोबाईल पॅंटच्या खिशात ठेवला. विकार खानने रात्री मोबाईल बंद करून ठेवला होता. सकाळी बाहेर जात असताना त्यांनी मोबाईल सुरू करून पॅंटच्या खिशात ठेवला. घराच्या पायऱ्या उतरत असताना खिशात ठेवलेल्या मोबाईल बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने सारे भयभीत झाले.

बॅटरीच्या स्फोटात खान यांच्या पायाची मांडी भाजली गेली असून, त्यांना घरातील सदस्यांनी लागलीच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत. परंतू, मोबाईल बॅटरीचा स्फोट नेमक्‍या कोणत्या कारणाने झाला हे समजू शकलेले नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delta Atlanta Flight Delays : अमेरिकेत तांत्रिक समस्या सुरूच, अटलांटा विमानतळावर डेल्टा एअर लाइन्सच्या विमानांना उड्डाणासाठी विलंब, प्रवाशांचे हाल

Pune Weather: पुणेकरांनो, हुडहुडी कमी होणार! पुढील २ ते ३ दिवसांत तापमानात वाढ; हवामान विभागाचा अंदाज

Air Fest 2026,:वायुसेनेच्या सामर्थ्याने गरजले अवकाश ;एअर फेस्ट’ला गर्दी, सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Solapur Road Accident: नुकताच साखरपुडा झाला, पण लग्नाआधीच काळाचा घाला; मळोलीतील रोहनसह दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Auto Rickshaw Strike : राज्यात आज रिक्षांचा संप; मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT