live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

"स्थायी'त भाजपकडून नवीन सदस्यांना संधी 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः महापालिकेच्या महासभेत आज स्थायी समितीतून निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागेवर आठ सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात भाजप व "एमआयएम'ने नवीन सदस्यांना संधी दिली तर शिवसेनेने त्यांच्या जुन्याच सदस्यांना समितीवर कायम ठेवले आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीची देखील मुदत संपल्याने समितीवर नवीन नऊ सदस्यांची निवड झाली. दरम्यान, आता स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीसाठी आता रस्सीखेच होणार आहे. 

महापालिकेची महासभा महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, उपायुक्त अजित मुठे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. यावेळी भाजप, शिवसेना, एमआयएमने स्थायी समिती सदस्यांची नावे बंद पाकिटात दिली. यावेळी नगरसचिवांनी नावे वाचवून दाखविली. यात स्थायी समितीवर भाजपचे पाच, "एमआयएम' एक तर शिवसेनेच्या दोन सदस्यांची नावे तर महिला बालकल्याण समितीवर भाजप, शिवसेना व एमआयएमच्या सदस्यांची नावे जाहीर 
केली तर महापौर व उपमहापौरांनी नवीन सदस्यांचे अभिनंदन केले. 

भाजपकडून नव्यांना संधी 
स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने चिठ्ठ्या काढून त्यांची निवृत्ती जाहीर करण्यात आली होती. यात भाजपचे पाच सदस्य होते. यात सभापती जितेंद्र मराठे यांच्यासह प्रतिभा पाटील, उज्ज्वला बेंडाळे, सुरेश सोनवणे, मयूर कापसे निवृत्त झाले होते. त्यांच्या जागेवर आज नवनाथ दारकुंडे, मुकेश सोनवणे, राजेंद्र पाटील, प्रतिभा देशमुख, रेश्‍मा काळे यांना संधी दिली आहे. तसेच एमआयएम पक्षाचे रियाज बागवान यांच्या जागेवर सैईदाबी युसूफ शेख यांची निवड झाली. 

शिवसेनेचे तेच सदस्य कायम 
स्थायी समितीवरील निवृत्त झालेले नितीन लढ्ढा, नितीन बरडे यांच्या जागेवर शिवसेनेने तेच सदस्य कायम ठेवले आहेत. त्यामुळे जुनेच खेळाडू शिवसेनेने कायम ठेवत पक्षातर्फे दोघांची नावे सभेपुढे देऊन निवड करण्यात आली. 

"महिला व बालकल्याण'ची निवड 
महिला व बालकल्याण समितीचा कार्यकाळ संपल्याने नवीन सदस्यांची निवड आज करण्यात आली. नवीन सदस्यांमध्ये भाजपच्या कांचन सोनवणे, गायत्री शिंदे, मीना सपकाळे, शोभा बारी, चेतना चौधरी, हसिनाबी शरिफा शेख, मीनाक्षी पाटील यांची निवड झाली. तर शिवसेनेकडून शबानाबी सादिक, जीजाबाई भापसे यांची निवड झाली. 

सभापतीपदासाठी होणार रस्सीखेच 
स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता भाजपचे नवीन व जुन्या सदस्यांमधून सभापतीपदाची निवड होणार आहे. यात ऍड. शुचिता हाडा, सुनील खडके यांच्या नावाची चर्चा असून, सभापतिपदासाठी रस्सीखेच होणार आहे. 

जितेंद्र मराठेंना पुन्हा संधी नाही 
स्थायी समितीच्या निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली होती. श्री. मराठे यांचे कार्यकाळातील चांगले काम लक्षात घेता त्यांची पुन्हा स्थायी समितीवर निवड होईल, असे वाटत होते. परंतु भाजपने सर्व नवीन सदस्यांना संधी देण्यावर भर दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT