Jalgaon Corporation
Jalgaon Corporation 
उत्तर महाराष्ट्र

थकबाकी भरावी की नाही यासाठी गाळेधारकांची आज बैठक

सकाळवृत्तसेवा

जळगाव - महापालिकेने अठरा व्यापारी संकुलांतील मुदत संपलेल्या गाळेधारकांना थकीत भाडे व मालमत्ताकर आकारणीचे बिल भरण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. पैसे भरण्याची अंतिम मुदत सहा फेब्रुवारी असल्याने
फुले मार्केटमधील गाळेधारक काल एकत्र आले होते. परंतु त्यांच्यात वाद झाल्यानंतर उद्या (ता. ३०) सर्व गाळेधारक बिलाचे पैसे भरावेत की नाही, याचा निर्णयासाठी बैठक घेणार आहेत. तर महापालिकेच्या किरकोळ वसुली विभागाकडे एका गाळेधारकाने पैसे न भरल्याने ती वसुलीच्या प्रतीक्षेत आहे. 

महापालिकेच्या अठरा व्यापारी संकुलांतील २३८७ गाळेधारकांची २०१२ मध्ये मुदत संपलेली आहे. त्यांच्याकडील थकीत भाडे व मालमत्ताकराची रक्कम, एका वर्षाचे पाचपट तसेच रेडिरेकनर दरानुसार दोन टक्के दंड आकारणी केलेल्या बिलांचे वाटप २० जानेवारीला देण्याच्या कामाला सुरवात केली. दोन-तीन दिवसांत सर्व संकुलांतील गाळेधारकांना बिले वाटप केली. त्यात फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटमध्ये किरकोळ वसुली विभागाचे पथक तीन ते चार दिवस वसुलीसाठी जाऊन एकाही गाळेधारकाने अद्याप पैसे भरलेले नाहीत. त्यातच काल फुले मार्केटमधील गाळेधारकांत बिलाच्या रकमेवरून सेंट्रल फुले मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश मतानी व अशोक मंधान यांच्यात वाद झाल्याने फुले मार्केटमध्ये गोंधळ झाला.

फुले मार्केटमधील गाळेधारकांची बैठक
महापालिकेने गाळेधारकांना दिलेल्या थकीत भाडे, मालमत्ताकराच्या बिलांबाबत महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांची उद्या (ता.३०) बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी सर्व गाळेधारक पैसे भरावेत की नाही यासंदर्भात निर्णय घेणार आहेत.

गाळेधारकांचा पैसे भरण्यास प्रतिसाद नाही
महापालिकेच्या किरकोळ वसुली विभागाने मुदत संपलेल्या अठरा व्यापारी संकुलांतील गाळेधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटवगळता अन्य संकुलांतील गाळेधारक पैसे भरण्यासाठी प्रतिसाद देत नसल्याची माहिती समोर आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT