Chalisgaon 
उत्तर महाराष्ट्र

तरवाडेत हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात शेळी व सहा पिले ठार

बापू शिंदे

तरवाडे (ता. चाळीसगाव) : गिरणा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरू असतानाच येथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात एक शेळी व सहा पिले काल मध्यरात्रीच्या सुमारास ठार झाले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

येथील रहिवासी परमेश्वर भगवान चौधरी यांची शेती गावाजवळच्या न्हावे रस्त्यालगत आहे. परमेश्वर चौधरी हे नेहमीप्रमाणे सायंकाळी शेतात गाय, बैल, शेळ्या बांधून गेले होते. शेळ्या या सहा फूट उंच जाळीत बांधल्या होत्या. काल मध्यरात्रीच्या सुमारास एका हिंस्त्र प्राण्याने एक शेळी व सहा पिले ठार केले आहेत. त्यांच्या पोटाचा भाग त्याने खाल्ला.

परमेश्वर चौधरी हे सकाळी शेतात गेल्यानंतर हा सगळा प्रकार लक्षात आला. दरम्यान काल रहीपुरी येथे म्हशीचे पारडू व वडगाव लांबे येथे शेळी ठार झाली आहे. यामुळे हे हल्ले बिबट्याने केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.

या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकरी संजय मोरे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली व मृत शेळ्यांचे छायाचित्र पाठवले. त्यावर ते म्हणाले की, प्राण्याच्या हल्ल्यावरून हा हल्ला बिबट्याने केला नसल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरण्याचे कारण नाही. शिवाय घटनास्थळी वन कर्मचाऱ्यांना लगेच पाठवतो. असे त्यांनी 'सकाळ'ला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT