oil rate 
उत्तर महाराष्ट्र

महिलांनो खाद्यतेलाचे दर पाहिले का?...वापर करावा लागणार कमी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सध्या खाद्यतेलाचे भाव चांगलेच कडाडले असल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेटही कोलमडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आता रोजच्या जीवनातील खाद्यतेलाच्या भावात किलोमागे 10 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला आता एकापाठोपाठ एक जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीचा सामना करावा लागत आहे. 

अवकाळी पावसाचा खाद्यतेलाला फटका 
अवकाळी पावसामुळे सोयाबीन, भुईमुगासह तेलबिया पिकांचे नुकसान झाल्याने त्याचे बाजारात परिणाम दिसू लागले आहेत. अवकाळी पावसाने खरिपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला. सोयाबीन, भुईमूग पिके वाया गेली आहेत. सोयाबीनला फटका बसल्याने त्याचा दणका तेलांच्या दराला बसला आहे. विविध प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात दिवाळीनंतर वाढ झाली आहे. 

भावातील फरक (प्रतिकिलो) 
एक ऑक्‍टोबर 2019 चे दर (रुपयांत) 
सोयाबीन - 85 ते 87 
सूर्यफूल - 96 ते98 
पाम तेल - 75 ते 77 
शेंगदाणा - 125 
सोयाबीन तेल डबा- 1350 ते 1400 

10 जानेवारी 2020 चे दर (रुपयांत) 

सोयाबीन- 105 
सूर्यफूल - 110 ते 115 
पाम तेल - 80 ते 85 
शेंगदाणा- 140 
सोयाबीन तेल डबा- 1550 ते 1600 
 

दररोज 15 ते 20 टीनची विक्री 
बाजारात सोयाबीन तेलाचे टीन 1550 ते 1600 रुपये प्रति टीन विक्री होते. सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या किमतीत बरेचसे साम्य आल्याने ग्राहकांना कोणतेही तेल घेतल्यास सारखेच आहे. परंतु जवळपास 80 टक्के ग्राहकांची सोयाबीन तेलाची मागणी असते. परंतु आता भाववाढ झाल्याने याचा परिणाम विक्रीवर जाणवत आहे. 
- हितेंद्र दोशी, जळगाव ऑइल डेपो, जळगाव 


सरकारने खाद्य तेल आयात करावे 
अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. परिणामी, विविध खाद्यतेलाचे भाव वाढले. खाद्य तेलाचे भाव वाढल्याचा परिणाम इतर वस्तूंच्या भाववाढीवर होणार आहे. हॉटेल, उपाहारगृहातील विविध खाद्यपदार्थ पदार्थ बनविण्यासाठी तेल वापरण्यात येते. त्यामुळे या सर्वच वस्तूंचे भाव वाढण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारने खाद्य तेल आयात केले, तरच तेलाच्या भाववाढीला आळा बसू शकतो; अन्यथा आगामी काही दिवसांत तेलाचे भाव आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 
- शैलेश मेहता, राज ऑइल डेपो, जळगाव 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT