live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

पहूरला पाण्याच्या टाकीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू; दोन जण जखमी 

सकाळ वृत्तसेवा

पहूर (ता. जामनेर) : ग्रुप ग्रामपंचायत पहूर पेठमधील नवीन बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवरून काम करत असताना तोल जावून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाल्याची घटना आज घडली. 

पहूर पेठ ग्रामपंचायती अंतर्गत बांधकाम सुरू असलेल्या नवीन पाण्याच्या टाकीवरून टायपिंग काम करत असलेले जळगाव येथील अशोक सपकाळे (वय 55), वासुदेव पाटील, सुभाष जोहरे या कामगारांचा काम सुरू होते. काम करत असताना तोल जाऊन ते खाली पडले. यातील अशोक सपकाळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले वासुदेव पाटील यांच्या पायात आसारी घुसल्याने ते गंभीर जखमी आहेत; तर सुभाष जोहरेदेखील जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, रामेश्वर पाटील, उपसरपंच श्‍याम सावळे व ग्रामस्थांनी धाव घेतली. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालय जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT