gulabrao patil
gulabrao patil  
उत्तर महाराष्ट्र

भाजपवाले बंडखोरांना मांडीवर बसवितात : गुलाबराव पाटील  

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांचे तिकीट कोणी कापले ते त्यांनी पहावे, त्यांनी नावे जाहिर केली आहेत. विधानसभेत जळगाव जिल्ह्यात शिवसेनेविरूध्द बंड करून उमेदवारी करणाऱ्या भाजपच्या लोकांची नावे आम्हीही जाहिर केली होती. त्यांनी त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. भाजपवाल्यानी या बंडखोरांना मांडीवर बसविले असा आरोप राज्याचे मंत्री व शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी केला. 
जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले,खडसे यांचे तिकीट कोणी कापले हे त्यांनी तपासावे त्यांच्या पक्षाच्या तो अंतर्गत विषय आहे. त्यांनी नावे जाहिर केली असतील तर पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी.बंडखोरी तर भाजपमध्ये मुळातच आहे. विधानसभा निवडणूकीत युती असतानाही भाजपने शिवनेच्या जिल्हयातील चारही उमेदवारांच्या विरूध्द बंडखोर उभे केले होते. विशेष म्हणजे या बंडखोरांच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंदी मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो होते. गळयात भाजपचे गमछे होते. आमचे कार्यकर्ते पक्के होते, म्हणून आमचे उमेदवार या बंडखोरांच्या छाताडावर पाय ठेवून विजयी झाले. मात्र या बंडखोरावर भाजपने कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट त्यांनी त्यांना त्यांना मांडीवर घेतले आहे. त्यामुळे भाजप बंडखोरावर कोणतीही कारवाई करीत नाही, तर त्यांना मांडीवरच घेते. 


जळगाव पंचायतवर शिवसेनेचा झेंडा 
पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी आज निवड प्रक्रिया राबविण्यता आली. सदर निवड बिनविरोध झाली असून, पदी शिरसोली गणाचे नंदलाल पाटील तर उपसभापतीपदी म्हसावद गणाच्या संगीता चिंचोरे या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती व उपसभापती निवडीसाठी एक- एकच अर्ज होते. यात सभापती पदासाठी नंदलाल पाटील यांच्या नावासाठी ललीता सोनवणे तर संगीता चिंचोरे यांच्या नावासाठी जागृती चौधरी सुचक होते. एक- एकच अर्ज असल्याने दोघांचीही निवड बिनविरोध करण्यात येत असल्याचे पिठासन अधिकारी आहेर यांनी घोषित केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT