prakash rao
prakash rao 
उत्तर महाराष्ट्र

रोज चहावाला, गुरुजी, डॉक्टरच्या भूमिकेत : पद्मश्री डी. प्रकाशराव

सकाळवृत्तसेवा

भुसावळ : मी रोज सकाळी चहावाला म्हणून माझे काम पार पाडीत असतो. दहातर शाळेत जाऊन मुलांसाठी स्वयंपाक करतो. त्यावेळी मी त्यांचा शिक्षक किंवा गुरुजी असतो, तर दुपारी दवाखान्यात जाऊन रुग्णांची सेवा करतो, त्यांना मार्गदर्शन करतो. त्यामुळे त्यांचा डॉक्टर असतो, तर सायंकाळी पुन्हा चहावाला होतो, अशी माहिती कटक येथील चहावाले पद्मश्री डी. प्रकाशराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथे उद्या (ता. ४) होणाऱ्या नुपूर उत्सवासाठी ते येथे आले असून आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. प्रकाश राव म्हणाले माझे वडील सैनिक होते. दुसऱ्या महायुद्धा नंतर ते कटक येथे आले व नोकरी शोधू लागले. त्यांना नोकरी मिळाली नाही. मात्र कुणीतरी पाच रुपयाची मदत केली. त्यातून त्यांनी चहाचे दुकान टाकले. वडिलांना पाचवीपासून मदत करत होतो. मला डॉक्टर होण्याची इच्छा होती. तसेच लेय जीवनात उत्कृष्ट फुटबॉलपटू होतो. मात्र वडिलांना मदत करता करता शाळेत गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले. त्यानंतर वडील आजारी पडत असल्याने चहाचा व्यवसाय मलाच सांभाळावा लागला. पुढे शिक्षण अपूर्ण राहिले. 
वयाच्या सतराया वर्षी मला टी.बी.व पॅरॅलिसिस असे दोन विकार जडले. मात्र त्यातून मी बरा झालो. त्या रुग्णालयाचे व मला रक्तदान करणाऱ्याचे ऋण फेडण्यासाठी मी रुग्णांची सेवा करतो, आतापर्यंत २१८ वेळा रक्तदान केले आहे. 

पंतप्रधानांशी संवाद 
पंतप्रधान यावेळी कटक दौऱ्यावर आले होते. त्याच्या दोन दिवस आधी शासकीय अधिकारी माझ्याकडे आले व ते मला म्हणाले पंतप्रधान मोदी तुम्हाला भेटू इच्छितात. त्यावेळी मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. मी माझ्या शाळेतील मुलांसह त्यांना भेटण्यास गेलो. त्यावेळी त्यांनी माझे भरभरून कौतुक केले. माझ्याशी संवाद साधला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मन की बात या आकाशवाणीवरील त्यांच्या कार्यक्रमात माझा आवर्जून उल्लेख केला. तो प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही असे प्रकाशराव म्हणाले. 

देहदानाचा संकल्प 
प्रकाशराव म्हणतात, मी ६२ वर्षाचा तरुण आहे. अजूनही चहाचा दुकानातून रुग्णालयात माझ्या चाळीस वर्षांपूर्वीच्या सायकलवरून जात असतो. आणखी काही वर्षे काम होईल. तसेच मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी देहदानाचा माझा संकल्प आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : भाजपचा रायबरेलीतून उमेदवार ठरला; या नेत्याला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT