उत्तर महाराष्ट्र

सुरक्षित रक्‍त पुरवठ्यासाठी "नॅट' टेस्टेड'! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः रक्‍तदात्याने दिलेल्या रक्‍तावर ते साठवून ठेवण्यापूर्वी घातक संसर्ग होऊ नये; यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या "एलायझा' तंत्राच्या माध्यमातून केल्या जातात, परंतु जिव्हाळ्याच्या माणसांचे जीवन अधिक सुरक्षित बनविण्यासाठी जागतिक दर्जाचे "नॅट' (न्युक्‍लिक ऍसिड टेस्ट) या प्रभावी तंत्रज्ञानाद्वारे सर्वाधिक सुरक्षित रक्‍त पुरवठा करण्याचे काम इंडियन रेडक्रॉस सोसायटीने केले आहे. 
"रेडक्रॉस'तर्फे सुरू केलेले रक्‍त संकलन आणि पुरवठ्याचे कामाने आता अधिक गती घेतली आहे. रक्‍तपेढीत संकलित केल्या जाणाऱ्या रक्तसाठ्यात दरवर्षी वाढ होत असते. यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वेळोवेळी अवलंब करत आहे. याशिवाय समाजात रक्‍तदानाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने स्वेच्छा रक्‍तदान प्रचार उपक्रमांतर्गत रेडक्रॉस रक्‍तपेढीचे वातानुकूलित "ब्लड डोनर व्हॅन रक्‍तदात्यांच्या दारी' या संकल्पनेअंतर्गत शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी जाऊन रक्‍तदानाचे महत्त्व विशद करून रक्‍तसंकलन केले जात आहे. 

वर्षभरात अत्याधुनिकतेचे तिसरे पाऊल 
"रेडक्रॉस रक्‍तपेढी' नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना अधिक सुरक्षित रक्‍त देण्यावर भर देत आहे. यामुळेच रक्‍तपेढीत गेल्या वर्षात अत्याधुनिक यंत्रणेकडे तिसरे पाऊल उचलले आहे. यामध्ये "ल्युको रिड्यूस्ड सिस्टिम', "एलायझा टेस्ट' या प्रणालीसह 1 जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्रात कोणत्याही रक्‍तपेढीत उपलब्ध नसलेली नॅट (न्युक्‍लिक ऍसिड टेस्ट) ही अधिक सुरक्षित रक्‍त देणारी यंत्रणा सुरू केली आहे. रेगुलर रक्‍तपिशवीपेक्षा "नॅट' टेस्टेड रक्‍त सातशे रुपयांनी महाग असले तरी अधिक सुरक्षित आहे. याशिवाय डिसेंबर 2007 ला रक्‍तातून पॅक सेल, प्लाझ्मा, क्रायप्रेसिपिटेडच्या विघटन, सिंगल डोनर प्लेटलेट तयार करण्यास सुरवात झाली. 

"नॅट' विंडो पिरीयड घटला 
नॅट' या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे रक्‍ताची चाचणीसाठी पी.सी.आर. हे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामध्ये जनुकातील डी.एन.ए. सेगमेंटचे विभाजन केले जाते. विभाजित केलेल्या सेगमेंटच्या अनेक कॉपीज बनविल्या जातात. शिवाय या यंत्रणेमुळे विंडो पिरीयड म्हणजे मनुष्यास जंतू संसर्ग झाल्यापासून ते जंतू संसर्ग लक्षात येण्याचा कालावधी हा कमी झाल्याने रोग निदान लवकर होते व रक्‍तातून जंतूसंसर्ग होण्याचा धोका टळतो. म्हणजेच एचआयव्ही संसर्गाची लागण "एलायझा'मधून 25 दिवसानंतर तर "नॅट'मधून 5 दिवसांचा विंडो पिरीयड आहे. त्याचप्रमाणे हिपॅटायटीस- बी संसर्गाचा विंडो पिरीयड एलायझामधून 56 दिवस तर नॅटमधून 20 दिवस आणि हिपॅटायटीस- सी संसर्गाचा विंडो पिरीयड एलायझामधून 70 दिवस तर नॅटमधून 5 ते 7 दिवसांचा आहे. 
 
"एचडीपी' व "कोल्ड स्टोरेज' 
रेडक्रॉसच्या रक्‍तपेढीत "एचडीपी' रूम 2008 पासून तयार करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ऑटो सिस्टिमद्वारे रक्‍तदात्याच्या शरीरातून 50 ते 60 हजार प्लेटलेट काढण्याची प्रक्रिया आहे. "एचडीपी' मशिनच्या माध्यमातून प्लेटलेट वेगळ्या करून रक्‍त पुन्हा डोनरच्या शरीरात परत जात असते. त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज रूममध्ये पाच मोठे फ्रिज असून, यात वेगवेगळे रक्‍त घटक साठवून ठेवण्याची यंत्रणा आहे. तर 10 हजार घटक स्टोरेज साठविता येतील इतके मोठे कोल्ड स्टोरेजची सुविधा देखील रक्‍तपेढीत कार्यान्वित करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT