उत्तर महाराष्ट्र

सैन्यभरतीत 68 हजार उमेदवार नशीब आजमावणार 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः भारतीय संरक्षण दल औरंगाबाद विभाग कार्यालयातर्फे विविध पदासाठी सैन्य भरती प्रक्रियेत 68 हजार उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सोमवारी मध्यरात्रीपासून भरतीची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी परभणी, नंदुरबार तसेच धुळे जिल्ह्यातील पाच हजार उमेदवारांना बोलावले असून आज सकाळपासून उमेदवार जळगाव शहरात दाखल झाले. 

मंगळवार (ता. 20) पासून 1 डिसेंबरपर्यंत भरती प्रक्रिया होणार आहे. त्यानुसार आज रात्रीपासून उमेदवारांनी भरतीसाठी जवळ गर्दी केली होती. सैन्यभरतीला औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलडाणा, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते. 4 नोव्हेंबर या ऑनलाइन अर्जाच्या मुदतीपर्यंत 68 हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. 
त्यानुसार प्रत्येक दिवशी पाच हजार उमेदवारांना बोलावून बारा दिवस ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

बस, रेल्वे स्थानकावर गर्दी 
सकाळपासूनच शहरातील विविध जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांची शहरात गर्दी दिसत होती. शिवतीर्थ मैदान, क्रीडा संकुल, रेल्वेस्थानक, बसस्थानक आदी ठिकाणी उमेदवारांची गर्दी होती. विशेष म्हणजे, काही उमेदवार विशेष वाहन करून आल्याने क्रीडा संकुल परिसरात वाहनांचीही गर्दी होती. जागा मिळेल तिथे उमेदवार आराम करत होते. तर शहरातील काही संस्थांनी उमेदवारांसाठी झोपण्याची सुविधा केली आहे. 

पाऊस आल्याने तारांबळ 
शहरात दुपारी चार-साडेचार वाजता पावसाला सुरवात झाली. त्यामुळे पर जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे मैदान व मोकळ्या जागेवर चिखल झाल्याने उमेदवारांना कुठे थांबायचे? असा प्रश्‍न पडला. 

स्केटिंग क्‍लबपासून प्रवेश 
सैन्यभरतीला आलेल्या उमेदवारांना रात्री साडेदहा वाजेपासून पोलिस स्केटिंग क्‍लबच्या बाजूने प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी उमेदवारांचे प्रवेश पत्र तपासून त्यावरील बारकोड स्कॅन करून त्यांची ऑनलाइन हजेरी घेतली जाईल. 168 सेंमीपेक्षा कमी उंची असलेल्या उमेदवारांना बाहेर काढले जाईल. तर उंची पूर्ण भरलेल्या उमेदवारांना पोलिस कवायत मैदानावर पाठविले जाईल. पदांच्या अनुसार उमेदवारांना सहा गटात बसविले जाईल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT