उत्तर महाराष्ट्र

सातपुड्याच्या दुर्गम भागातही पोचली अन्नधान्याची मदत 

सकाळवृत्तसेवा

जळगाव  : भरारी फाउंडेशन व वर्धिष्णू सेवेच्या वतीने सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील आंबापाणी आणि थोरपाणी येथील आदिवासी कुटुंबांना 15 दिवसांचे धान्य वाटप करण्यात आले. 

"कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन सुरू असून, या काळात गरीब, कष्टकरी, गरजू कुटुंबांना काही दिवसांचे धान्यवाटप करण्याचा उपक्रम के. के. कॅन्सचे संचालक रजनीकांत कोठारी यांच्या पुढाकाराने सुरू आहे. या उपक्रमात आजपर्यंत पंधराशे परिवारांना किमान 15 दिवस पुरेल एवढे अन्नसाहित्य वाटप करण्यात आले आहे. 

आज यावल तालुक्‍यातील सातपुडा पर्वतराजीत आंबापाणी व थोरपाणी या आदिवासी पाड्यातील 150 परिवारांपर्यंत अन्नसामुग्री पोहोचविण्यात आली. कृषी अधिकारी अनिल भोकरे, सुभाष राऊत, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, प्रशांत पाटील, मयूर चौधरी, डॉ. सुभाष पवार, अजय पाटील आदींचेही या उपक्रमासाठी सहकार्य मिळत आहे. भरारीचे दीपक परदेशी, अद्वैत दंडवते, चेतन पाटील, गुलाब तडवी यांनी आदिवासी परिवारंपर्यंत ही सामग्री पोहचवली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhimashankar Darshan: भीमाशंकर मंदिराला पाण्याचा वेढा; भाविकांच्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर, दर्शनासाठी येणार असाल तर ही बातमी वाचा!

Powai Lake: मुंबईकरांची धडधड वाढली! तलावातून 7 फूट मगर बाहेर आली; नागरिकांची धावपळ, वन विभागाने अनर्थ टाळला

Latest Marathi News Update : मिसिंग लिंकवर दरड कोसळली, दरड आम्ही आणली नव्हती : बावनकुळे

Ajinkya Rahane: 'वर्ल्ड कपचा हिरो अन् संघाबाहेर?' संजू सॅमसनच्या निवडीवर रहाणेचा थेट सवाल; BCCI ला सुनावलं?

Ethanol Petrol Issues : पावसाळ्यात तुमचीही दुचाकी अचानक बंद पडतेय? पेट्रोलमधील 'या' गोष्टीमुळे वाढली वाहनचालकांची डोकेदुखी; कशी घ्यावी खबरदारी?

SCROLL FOR NEXT