live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

 तर महिला राष्ट्राची सारथी : शताब्दी पांडे

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः महिलांनी स्वतःचे सामर्थ्य जाणले, तर त्या राष्ट्राच्या सारथी बनू शकतात. स्वतः देश चालवू शकतात, असे प्रतिपादन देशात सहकाराच्या माध्यमातून महिलांना आर्थिक व सामाजिक सन्मान देण्याचे काम करणाऱ्या भारत सरकार नीती आयोगाच्या सदस्या, बालसंरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा शताब्दी पांडे (छत्तीसगड) यांनी आज येथे केले. 
"सहकार भारती'तर्फे आयोजित महिला बचत गट व सहकार क्षेत्रातील महिलांचा जिल्हास्तरीय मेळावा आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाला, त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. जळगाव जनता बॅंकेच्या संचालिका शोभाताई पाटील अध्यक्षस्थानी होत्या. "नाबार्ड'चे जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत झांबरे, डॉ. आरती हुजूरबाजार, बचत गटाच्या महानगराध्यक्षा अनिता वाणी, सुनीता जोहरे, संयोजिका रेवती शेंदुर्णीकर आदी उपस्थित होते. 
शताब्दी पांडे म्हणाल्या, की सध्या विभक्त कुटुंबपद्धती वाढत आहे. देशातील महिलांचे प्रबोधन करताना स्त्रीमुक्ती हा आपला उद्देश नसून, स्त्रीशक्ती हा आपला उद्देश आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महिलांनी महिलांच्या मदतीने स्वतःची उन्नती साधायची, या विचाराने प्रेरित होऊन कामाला सुरवात केली. महिलांना प्रशिक्षित करण्यासाठी "सॉफ्ट टॉइज' बनविण्याचे शिकविले. स्वतःबाबत क्षमता जाणण्यासाठी स्वयंसहायता सर्वेक्षण करायला हवे. आपण दिखाव्यावर खर्च करतो, त्याऐवजी आवश्‍यक त्या रीतिरिवाजांचे पालन करावे. महिला हस्तकौशल्याच्या वस्तू, चित्र, आर्टिफिशिअल दागिने, हस्तशिल्प विकास निगमअंतर्गत बनवून विकू शकतात. माध्यान्ह भोजन, लोणचे यांसारखे उद्योग महिला स्वयंसहायताच्या माध्यमातून "नाबार्ड'च्या सहाय्याने करू शकतात. "गुगल'च्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करू शकतात. 
उत्कृष्ट कार्याबद्दल आदिशक्ती, गुरुमाऊली, सरस्वती, साईनाथ बचत गटांचा सत्कार करण्यात आला. "सहकार भारती'चे संजय बिर्ला, दिलीप पाटील, चंद्रहास गुजराथी, नेमिचंद जैन, विश्वास कुलकर्णी, ऍड. विकास देवकर, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. मनीषा खडके यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी शांताताई वाणी, सविता कोत्तावार, वैशाली महाजन, मीना जोशी, सविता नाईक, सावित्री साळुंखे आदींनी सहकार्य केले. 
 
बचत गटांना निविदा मिळाव्यात 
जिल्हास्तरावर काढण्यात येणाऱ्या शासकीय- निमशासकीय माध्यान्ह भोजन, स्टेशनरी, साफ-स्वच्छता, स्वस्त धान्य दुकान आदींच्या निविदा देताना महिला बचत गटांना प्राधान्य द्यावे, असा ठराव उपस्थितांकडून करण्यात आला. तशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

SCROLL FOR NEXT