shri sant muktai 
उत्तर महाराष्ट्र

असा होणार श्री संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा 

सकाळवृत्तसेवा

मुक्ताईनगर : श्री संत मुक्ताबाई समाधिस्थळ श्री क्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर) येथे संत मुक्ताबाई अंतर्धान सोहळा होत असतो. यंदा कोरोना या महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय निर्देशानुसार साजरा होणार असून भाविकांनी सोहळा 10 ते 17 मे दरम्यान घरीच साजरा करावा. 

दरवर्षी परंपरेने भव्य अंतर्धान सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पंढरपूर येथून श्रीपांडूरंग परमात्मा व संत नामदेव महाराज; त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथ व कौडण्यपूर येथून रुक्‍मिणी माता पादुका पालख्या व 50 वर दिंड्यासह राज्यभरातील हजारो भाविक वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. संत नामदेव महाराज यांच्या विद्यमान वंशज यांच्यावतीने केशवदास नामदार महाराज पंढरपूर यांचे समाधी सोहळ्याचे गुलालाचे कीर्तन होत असते परंतु यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने शेकडो वर्षांपासूनची परंपरा खंडित होऊ नये म्हणून सरकारने दिलेल्या निर्देशानुसार संस्थानतर्फे सोहळा साजरा करण्यात येणार आहे. संत मुक्ताबाई समाधीसमोर 10 मे पासून 2 सेवेकरी प्रातिनिधिक स्वरूपात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दररोज दुपारी प्रवचन, संध्याकाळी हरिपाठ आदी कार्यक्रम नित्यनियमाने करतील. पारायणाचे लाइव्ह प्रसारण संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर या फेसबुक पेजवर दररोज सकाळी 7 ते 9 या वेळेत करण्यात येईल. सोहळ्यात दरवर्षी सहभागी होणारे व ज्यांना इच्छा असूनही आजपर्यंत वेळ मिळत नव्हता अशांनी घरबसल्या ऑनलाइन पारायण व सोहळ्यातील इतर कार्यक्रमात घरूनच सहभागी व्हावे असे आवाहन संस्थानने केले आहे. 
 
नियोजित वारी रद्द 
संत मुक्‍ताबाई मुख्य अंतर्धान समाधी वैशाख कृष्ण 10, रविवारी (ता. 17) सकाळी 11 ते 1 या वेळेत घरातच संत मुक्ताबाई प्रतिमेवर पुष्पवृष्टी व आरती करून साजरा करावा. यावर्षी पंढरपूर त्र्यंबकेश्वर कौडण्यपूर येथून पादुका पालख्या येणार नाही. तसेच परिसरातील दिंड्यांनी आपली नियोजित वारी रद्द करावी, तसेच बाहेरचे अथवा स्थानिक कुणीही भाविकांनी मंदिरात येऊ नये. लॉकडाउन पर्यंत मंदिर पूर्णपणे बंद केले आहे. नागरिकांनी लॉकडाउनचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, व्यवस्थापक उद्धव जुनारे यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT