soniya kabra
soniya kabra 
उत्तर महाराष्ट्र

Motivation : भारत-केनिया.. प्रेरणादायी प्रवास "व्हाया' अमेरिका 

सचिन जोशी

जळगाव : उच्च शिक्षणासाठी गाव-शिव ओलांडणंही टाळावं, या मानसिकतेचा आपला खानदेश हा प्रदेश.. या ग्रामीण भागातील जळगावसारख्या लहान शहरातील उद्योजकाची मुलगी अकरावीपासूनच सातासमुद्रापार शिक्षणासाठी एकटीच निघते, काहीतरी "हटके' करण्याची जिद्द मनी बाळगून.. टॅलेंटच्या जोरावर प्रत्येक टप्प्यावर जागतिक शिष्यवृत्ती मिळवून शिक्षण घेतानाच प्रवासी वाहतुकीचा पायलट प्रोजेक्‍ट विकसित करते.. अमेरिकेतील मानाचा "हर्ल्ट' पुरस्कार मिळवते.. या पुरस्कारातील निधीचा विनियोग करत केनियात प्रवासी वाहतुकीचा "स्टार्टअप' सुरु करते.. आणि अल्पकाळातच केनियातील सुमारे 35 लाख प्रवाशांना सेवा पुरविण्यापर्यंत तिचा व्यवसाय प्रस्थापित होतो... 
होय, ही यशोगाथा आहे सोनिया काबरा या उमद्या तरुणीची. जळगावातील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक किशन काबरा यांची नात, संदीप व फॅशन डिझायनर सपना यांची कन्या. सेंट जोसेफ शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोनियाने विदेशाची कास धरली. हॉंगकॉंगला युनायटेड वर्ल्ड कॉलेजला ऍडमिशन घेणारी ती पहिली जळगावकर. 

हॉंगकॉंग.. अमेरिकेमार्गे केनिया 
त्यानंतर 12वीपर्यंतचे शिक्षण हॉंगकॉंगमध्ये पूर्ण केले. सोनियाला तिच्या टॅलेंटमुळे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेची 100 टक्के शिष्यवृत्ती मिळाली. अंडरग्रॅज्युएट तिने मेन कोर्स बायोकेमिस्ट्रीतून केले. कॉम्प्युटर सायन्स व बिझनेस तिचे पर्यायी विषय होते. परंतु, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याचं काम करावं, म्हणून तिने अभ्यासक्रमातील भाग म्हणूनही क्‍लब सुरु केला. 

बससेवेचा "पायलट प्रोजेक्‍ट' 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्‍लिंटन यांच्या क्‍लिंटन ग्लोबल इनिशिएटीव्ह ऍण्ड हल्ट प्राईज फाउंडेशन या संस्थेकडून या पुरस्कारासाठी अर्ज मागविले जातात. जागतिक आव्हाने, समस्यांवर सोल्यूशन देण्याचे प्रोजेक्‍ट या स्पर्धेसाठी तयार केले जातात. दरवर्षी ही स्पर्धा होते. या स्पर्धेच्या कॅम्पस राउंडमध्ये सोनियाच्या ग्रुपची निवड हुकली. मात्र, ऑनलाइन राउंडमध्ये निवड होऊन चार जणांच्या टीमने बोस्टन येथे प्रोजेक्‍टवर काम सुरु केले. त्यासाठी 8 आठवड्यांचे प्रशिक्षणही त्यांना संस्थेकडून मिळाले. 

"हल्ट' पुरस्काराची मानकरी 
त्या आधारे केनियातील प्रवासी वाहतुकीच्या समस्येवर सोल्यूशन देणारा पायलट प्रोजेक्‍ट त्यांनी तयार केला. केनियात तेव्हा प्रवासी वाहतुकीची मोठी समस्या होती, त्याचा अभ्यास करुन सोनियाच्या ग्रुपने पाच बस मिळवून या प्रायोगिक सेवेत 10 हजार प्रवाशांना सुविधा दिली. आणि या प्रोजेक्‍टला मानाचा "हल्ट' पुरस्कार मिळाला. या पुरस्कारासोबत 1 मिनिलयन डॉलर्स म्हणजे भारतीय पैशांत 7 कोटींचा निधी हा प्रोजेक्‍ट विकसित करण्यासाठी मिळाला. 
 
प्रवासी बससेवेचे "स्टार्टअप' 
या निधीच्या माध्यमातून सोनियाने 2016मध्ये केनियाची राजधानी नैरोबी येथे प्रवासी वाहतूक सेवा सुरु केली. केनियात अनेक वर्षांपासून रोकडऐवजी "एम-पेसा'चा वापर केला जातो. "सफारीकॉम'शी करार करत सोनियाने ही सेवा सुरु केली. टप्प्याटप्प्याने ती विकसित केली. केनियातील ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. त्यांच्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरलीय. सुरवातीला "मॅजिक बस' या नावाने सोनियानेही कंपनी सुरु केली. मात्र, भारतात अशा नावाची वेगळी कंपनी असल्याने ते नाव बदलून सोनियाने "बू- पास' हे नाव तिच्या कंपनीला दिलेय. डोमेस्टिक विमानसेवेसह केनियन रेल्वेजचे तिकिट बुकींगही सोनिया या कंपनीच्या माध्यमातून करते. सोनियायाच्या या सेवेस आफ्रिकेच्या नामांकित बॉश कंपनीचा "टॉप मोबॅलिटी स्टार्टअप' पुरस्कारही मिळालाय.. 

दृष्टीक्षेपात "बू- पास' 
प्रवासीसेवा कंपनी : बू- पास 
कंपनीतील कर्मचारी संख्या : 22 
केनियातील एजंटस्‌ : 600 
आतापर्यंत लाभार्थी प्रवासी : 35 लाख 
रेल्वे तिकीट बुकिंग प्रमाण : 70% 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Bhandup Cash: पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Latest Marathi News Live Update: भांडूपमध्ये निवडणूक भरारी पथकाची कारवाई, पैशांनी भरलेली व्हॅन जप्त

SCROLL FOR NEXT